India vs South Africa : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या खेळाडूंना टीम संधी, जाणून मॅचेसचं वेळापत्रक

दक्षिण आफ्रिकेची टीम सुरुवातीला T20 सामने खेळेल, त्यानंतर 50 ओव्हरचे तीन सामने होणार आहेत.

India vs South Africa : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या खेळाडूंना टीम संधी, जाणून मॅचेसचं वेळापत्रक
Team india
Image Credit source: BCCI
| Updated on: Sep 27, 2022 | 2:32 PM

टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) मालिकेत विजय मिळविला. त्यामुळे खेळाडूंना एकप्रकारे मोठा विश्वास आला आहे. कारण आशिया चषकात (Asia Cup 2022) पराभव झाल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवरती जोरदार टीका झाली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात गोलंदाजी खराब झाली. परंतु फलंदाजांनी चांगली खेळी केल्यामुळे सहज विजय मिळविता आला. उद्यापासून दक्षिण ऑफ्रिकेसोबत मॅचेस सुरु होणार आहेत.

दक्षिण आफ्रिकेची टीम सुरुवातीला T20 सामने खेळेल, त्यानंतर 50 ओव्हरचे तीन सामने होणार आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी देण्यात आली आहे.

इथे यावेळेत होणार T20 सामने

पहिला T20: 28 सप्टेंबर,
तिरुवनंतपुरम, संध्याकाळी 7.30

दुसरा T20: 2 ऑक्टोबर,
गुवाहाटी, संध्याकाळी 7.30

तिसरा T20: 4 ऑक्टोबर,
इंदूर, संध्याकाळी 7.30

भारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका

पहिली वनडे: ६ ऑक्टोबर,
लखनौ, दुपारी १.३० वाजता

दुसरी वनडे: 9 ऑक्टोबर,
रांची, दुपारी 1.30 वाजता

तिसरी वनडे: 11 ऑक्टोबर,
दिल्ली, दुपारी 1.30 वाजता

T20 मालिकेसाठी टीम इंडिया

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, शाहबाज अहमद अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

T20 मालिकेसाठी आफ्रिका टीम

दक्षिण आफ्रिकेचा संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रेझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्सिया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले शॉम्सी, रिले शॉम्सी, ट्रिस्टन स्टब्स, यॉर्न फॉर्च्यून, मार्को यान्सन, ए. फेलुकायो.