AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : फॉर्मसाठी धडपडणाऱ्या अभिषेक शर्माला ऑस्ट्रेलियाई दिग्गज रिकी पाँटिंग एवढचं बोलला की, तू फक्त..

T20 World Cup 2026 : चालू टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्माचा धावांसाठी संघर्ष सुरु आहे. झिम्बाब्वे विरुद्ध अर्धशतकाचा अपवाद वगळता त्याला एकाही सामन्यात दमदार कामगिरी करता आलेली नाही. त्याला पाँटिंगने एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

T20 World Cup 2026 : फॉर्मसाठी धडपडणाऱ्या अभिषेक शर्माला ऑस्ट्रेलियाई दिग्गज रिकी पाँटिंग एवढचं बोलला की, तू फक्त..
Abhishek Sharma Image Credit source: PTI
| Updated on: Mar 04, 2026 | 1:19 PM
Share

टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा टी20 मधला नंबर 1 फलंदाज आहे. पण सध्या त्याचा धावांसाठी संघर्ष चालू आहे. यंदाचा टी20 वर्ल्ड कप त्याला लक्षात ठेवायला अजिबात आवडणार नाही. कारण सुपर-8 राऊंडमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध अर्धशतकाचा अपवाद वगळता त्याला एकाही सामन्यात दमदार कामगिरी करता आलेली नाही. वेस्ट इंडिज विरूद्धच्या करो या मरो सामन्यात तो अपयशी ठरला. फक्त 10 रन्स करुन त्याने पॅव्हेलियनची वाट धरली. स्पिनर विरुद्ध अभिषेक शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. शिमरॉन हेटमायरला त्याने एक सोपा झेल दिला.

आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये खेळल्या गेलेल्या सहा सामन्यात अभिषेकने फक्त 80 धावा केल्या आहेत. USA, पाकिस्तान आणि नेदरलँड्स विरूद्धच्या सामन्यात तो शुन्यावर आऊट झाला. खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या अभिषेक शर्माला ऑस्ट्रेलियाई दिग्गज रिकी पाँटिंगने सल्ला दिला आहे. वानखेडे स्टेडियमवर 5 मार्च रोजी होणार्‍या सेमीफायनल सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पाँटिंगने हा सल्ला दिला आहे. मानसिक दृष्ट्‍या ताजातवाना हो आणि रिलॅक्स हो असा सल्ला पाँटिंगने अभिषेकला दिला आहे.

पाँटिंगने काय सल्ला दिला?

“जेव्हा तुम्ही खराब फॉर्मचा सामना करत असता तेव्हा प्रत्येकवेळी नेट्समध्ये जाऊन तास-दीडतास प्रॅक्टिस करणं आवश्यक नाहीय. काहीवेळा मानसिक दृष्टया ताजातवाना होण्यासाठी सुट्टी घेणं केव्हाही चांगलं. तुमचं कौशल्य तुमच्यापासून दूर जाणार नाही” असं पाँटिंग म्हणाला. “अशा प्रकारच्या टुर्नामेंटमध्ये जेव्हा तुम्ही सतत दबावाखाली असता. रिझल्ट अपेक्षित येत नाही. त्यावेळी नेट्समध्ये जाऊन थोडी गोलंदाजी करावी, फिल्डिंग करावी” असं पाँटिंग म्हणाला.

अभिषेकला बाहेर बसवायचं तर कोणाला टीममध्ये इन करायचं?

“रिकी पाँटिंगने अभिषेक शर्मावर विश्वास व्यक्त केला. त्याचा इंग्लंड विरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. त्यामुळे हेड कोच गौतम गंभीरने त्याला टीममधून ड्रॉप करु नये” असं पाँटिंग म्हणाला. मागच्यावर्षी जानेवारी महिन्यात वानखेडेवर इंग्लंड विरुद्ध पाचव्या अखेरच्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माने शतकी खेळी साकारली होती. संघ व्यवस्थापनाला सेमीफायनलच्या महत्वाच्या सामन्यात अभिषेकला ब्रेक द्यायचा असेल तर रिंकू सिंहचा टीममध्ये समावेश करावा असा पाँटिंगने सुचवलं आहे. “अभिषेकचा दिवस असतो तेव्हा तो मॅच विनर असतो. तुम्ही त्याला बाहेर बसवून रिंकूचा टीममध्ये समावेश करणार असाल तर तुम्ही दुसऱ्या मॅचविनरला टीममध्ये आणता आहात” असं पाँटिंग म्हणाला.

Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?