Video : सुपर ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video : सुपर ओव्हरचा थरार, स्मृती मानधना आणि रेणुका सिंग तुफान बॅटिंग, सुपर ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव, पाहा व्हिडिओ

Video : सुपर ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Team india
Image Credit source: Getty Images
| Updated on: Dec 12, 2022 | 10:03 AM

मुंबई: महिला टीम इंडिया (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) महिला टीम यांच्यात काल रोमांचक सामना डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये पाहायला मिळाला. रोमांचक सामन्यात टीम इंडियाचा विजयी झाली. त्यामुळे मालिकेत बरोबरी झाली आहे. T20 मालिकेत पहिली मॅच ऑस्ट्रेलिया टीमने जिंकली होती. कालच्या मॅचमध्ये प्रेक्षकांना सुपर ओव्हर पाहायला मिळाली. सुपर ओव्हरमध्ये (super over) स्मृती मानधना आणि रेणुका सिंग यांनी ऑस्ट्रेलिया गोलंदाजांची धुलाई केली, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

अशी होती सुपर ओव्हर

  1. पहिल्या चेंडूवर ऋचा घोष हीने षटकार मारुन प्रेक्षकांमधील उत्साह वाढवला, तसेच मॅचमधील रंगत देखील वाढवली.
  2. हीथर ग्राहम हीने ऋचा घोषची दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतली. त्यामुळे तिथं सामन्यातील टेन्शन वाढलं होतं.
  3. हरमनप्रीत कौर हीने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेऊन स्ट्राइक मंधानाला दिली.
  4. स्मृति मंधानाने चौथ्या चेंडूवर चौकार लगावला, प्रेक्षक पुन्हा मैदानात नाचू लागले.
  5. स्मृति मंधानाने पाचव्या चेंडूवर पुन्हा जोरदार षटकार लगावला.
  6. सहावा चेंडू देखील जोरात मारला होता, परंतु तो चेंडू सीमारेषेजवळ अडवला.

महिला टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये 20 धावा काढल्या होत्या. दुसऱ्या ऑस्ट्रेलियाने फलंदाजी केली, त्यांनी सोळा धावा काढल्या त्यामुळे टीम इंडियाचा विजय झाला.

ऑस्ट्रेलिया टीमने सुरुवातीला फलंदाजी करीत असताना 188 धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाच्या स्मृति मंधाना (79) शेफाली वर्मा (34), कप्तान हरमनप्रीत कौर (21) यांनी चांगली खेळी केली, त्यामुळे टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची टाय झाली होती.