Tokyo Paralympics च्या उद्घाटन समारंभात मरियप्पन ध्वजवाहक नसणार, कोरोनाच्या संकटामुळे बदल, नेमकं प्रकरण काय?

टोक्यो ऑलिम्पिक्सनंतर आता संपूर्ण जगाचे लक्ष पॅरालिम्पिक्स खेळांकडे लागले आहे. टोक्योमध्येच आयोजन करण्यात आलेल्या या खेळांमध्ये कोरोनाही डोकं वर काढू लागला आहे.

Tokyo Paralympics च्या उद्घाटन समारंभात मरियप्पन ध्वजवाहक नसणार, कोरोनाच्या संकटामुळे बदल, नेमकं प्रकरण काय?
थैंगावेलु मरियप्पन
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 12:08 PM

Tokyo Paralympics : टोक्यो पॅरालिम्पिक्सचा (Tokyo Paralympics 2020) उद्घाटन समारंभ आज असून यावेळी भारताकडून ध्वजवाहक म्हणून लांबउडी खेळाडू थैंगावेलु मरियप्पन (Thangavelu Mariyappan) हा दिसणार होता. पण आता त्याच्या जागी शॉट पुट खेळाडू टेक चंद (Tek Chand) भारतीय संघाचं नेतृत्त्व करणार आहे. याचे कारण टोक्योला येताना मरियप्पन हा एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हा बदल करण्यात आला आहे. सध्या मरियप्पनला विलगीकरणात ठेवण्यात आले असून 6 दिवस त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. मात्र तरीही सुरक्षेचं पाऊल म्हणून मरियप्पन उद्घाटन समारंभात दिसणार नाही.

टोक्यो पॅरालिम्पिक्सचा उद्घाटन समारंभ आज सायंकाळी 4 वाजता होईल. याचे लाईव्ह टेलीकास्ट यूरोस्पोर्ट्स चॅनलवर होणार आहे. भारतीय पॅरालिम्पिक्स कमिटीने भारताकडून आधी ध्वजवाहक म्हणून मरियप्पनच्या नावाची घोषणा केली होती. पण आता टेक चंदला हा मान देण्यात आला आहे. 2019 मध्ये वर्ल्ड पॅरा एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिसऱ्या स्थानावर राहत मरियप्पनने टोक्योमध्ये पॅरालिम्पिक्स खेळांसाठी पात्रता मिळवली.

उद्घाटन समारंभात 5 भारतीय खेळाडू घेणार होते सहभाग

26 वर्षीय मरियप्पम तामिळनाडुच्या सलेम येथील रहिवासी आहे. 2016 च्या रिओ पॅरालिम्पिक्स खेळांमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या मरियप्पमला त्याच्या कामगिरीसाठी खेळ रत्नही मिळाला आहे. टोक्यो पॅरालिम्पिक्सच्या उद्घाटन समारंभातही त्याला ध्वजवाहकाचा मान दिला होता. त्याच्यासह 5 आणखी खेळाडू आणि  6 अधिकारी भारतीय दलात दिसणार होते. या 5 जणांमध्ये मरियप्पनसह विनोद कुमार, टेक चंद, जयदीप आणि शकीना खातून यांची नावं होती. ज्यामध्ये आता मरियप्पनशिवाय इतर चौघे दिसतील.

भारताकडून 54 खेळाडू पॅरालिम्पिक्समध्ये

24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत पार पडणाऱ्या या खेळांमध्ये भारतीय खेळाडू उत्तम कामगिरी करतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. पॅरालिम्पिक्स खेळांमध्ये भारताकडून 9 वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 54 पॅरा-एथलीट सहभाग घेतील. या सर्वांना नरेंद्र मोदींपासून ते क्रिडामंत्री अशा संपूर्ण भारतवासियांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

इतर बातम्या

Tokyo Paralympics 2020: पॅरालिम्पिक्समध्येही यश मिळवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज, वाचा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

Tokyo Paralympics: पंतप्रधान मोदींनी पॅरालिम्पिक्ससाठी रवाना होणाऱ्या खेळाडूंशी साधला संवाद, 24 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात

(At tokyo paralympics thangavelu mariyappan will not be part of indias opening ceremony replaced by tek chand as flag bearer)

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.