ऋषभ पंत ऑस्ट्रेलियात पोहोचला, त्याच्या मागे लगेच उर्वशी रौतेला आली, सोशल मीडिया वर Memes चा पाऊस

दिल्लीत रौतेलाने पंतला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु पंतने नकार दिल्याने दोघांमध्ये सोशल मीडियावर एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळाले.

ऋषभ पंत ऑस्ट्रेलियात पोहोचला, त्याच्या मागे लगेच उर्वशी रौतेला आली, सोशल मीडिया वर  Memes चा पाऊस
Urvashi Rautela and Rishabh Pant
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 10, 2022 | 12:46 PM

मागच्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज ऋषभ पंतकडून (Rishabh Pant) चांगली कामगिरी केलेली नाही म्हणून त्याच्यावरती अनेकांनी टीका केली आहे. त्याचबरोबर एका अभिनेत्रीमुळे त्याची मैदानाबाहेर सुद्धा अधिक चर्चा सुरु आहे. आशिया चषकात अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही दिसल्यापासून ती पंतचा पाठलाग करीत असल्याची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळाली.

दिल्लीत रौतेलाने पंतला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु पंतने नकार दिल्याने दोघांमध्ये सोशल मीडियावर एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळाले. तसेच काही दिवसांपुर्वी पंतचा वाढदिवस झाला. त्यावेळी सुद्धा पंतचं नाव न घेता रौताने इंन्स्टाग्रामच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या, त्यामुळे सुद्धा ती पुन्हा चर्चेत आली.

काही दिवसात विश्वचषक सुरु होणार, त्यामुळे क्रिकेटचे अनेक चाहते ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत. उर्वशी सुद्धा ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. तिने मी माझ्या प्रेमाला फॉलो करीत असल्याचे आशयात लिहिले आहे. त्यामुळे दोघांच्या चाहत्यांनी आत्तापासून दोघांना ट्रोलिंग करायला सुरुवात केली आहे.