AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : विजय होताच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं, खोचक टीका करत म्हणाले…

महाराष्ट्र नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाला, तर मविआला पुन्हा पराभव पत्करावा लागला. महायुतीचे २१५ नगराध्यक्ष निवडून आले. शिवसेना शिंदे गटालाही चांगलं यश मिळालं असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयाबद्दल जनतेचे आभार मानत, 'खरी शिवसेना' कोणती हे मतदारांनी दाखवून दिल्याचे म्हटले. त्यांनी मविआच्या पराभवावरही टीका केली केली आणि ठाकरेंना खोचक टोला लागावला.

Eknath Shinde : विजय होताच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं, खोचक टीका करत म्हणाले...
एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं..Image Credit source: social media
| Updated on: Dec 21, 2025 | 3:17 PM
Share

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि काल 20 तारखेलाही राज्यातील विविध भागांत नगर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदान झालं, तर आज मतमोजणी होऊन निकाल लागला. या निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाला असून मविआला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला आहे. महायुतीचे 215 नगराध्यक्ष निवडून आले असून मविआच्या वाट्याला फक्त 49 जागा आल्या. महायुतीमध्ये भाजप मोठा पक्ष ठरला असून भाजपला 119, शिवसेना शिंदे गट 60 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 36 नगराध्यक्ष आले आहेत. मविआमध्ये काँग्रेसला 32, शिवसेना (ठाकरे गट) 9 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गाटाला 8 जागा जिंकता आल्या आहेत

दरम्यान या विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत विजयासाठी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. एवढं मोठं यश शिवसेनेला मिळालं आहे, त्याबद्दल मतदारांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो, असं ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी मविआ आणि शिवसेना ठाकरे गटालाही चिमटे काढले. शिवसेनेचा (शिंदे गट) स्ट्राईक रेट चांगले असल्याचे सांगत त्यांनी खरी शिवसेना कोणती हे मतदारांनी दाखवून दिल्याचा पुनरुच्चार करत ठाकरे गटाला डिवचलं.

जेवढ्या संपूर्ण मविआच्या जागा त्यापेक्षाही शिवसेनेच्या जागा जास्त

ठाकरे गटाला अपयश आलं आहे, मविआमध्ये दुफळी निर्माण झालेली आहे का, असा सवाल एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला असता, त्यांनी एका वाक्यात खोचक टोला लगावला. ‘महाविकास आाघाडीची, सगळ्यांची बेरीज पकडली, तरी एकट्या शिवसेनेची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्त आहे, ‘ असं शिंदे म्हणाले. खरी शिवसेना कोणाची हे मतदारांनी या निवडणुकीमध्ये मतदारांनी दाखवून दिलं असं म्हणत त्यांन ठाकरे गटाला पुन्हा डिवचलं.

जनतेच्या न्यायलयात मिळाला कौल 

खरी शिवसेना ही शिवसैनिकांची आहे, या महाराष्ट्रातल्या जनतेची आहे, काही लोकांना ही आपली मक्तेदारी वाटत होती . काही लोकं मालक आणि नोकर समजत होते, पण शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे. म्हणूनच इथे कोणीचमालक नाही की कोणी नोकर नाही, इथे आम्ही सर्वच कार्यकर्ते आहोत. म्हणूनच आम्हाला या निवडणुकीत एवढं चांगलं यश मिळालं आहे. काही लोकं निवडणूक आयोगाला बोलत होते, कोर्टावर आरोप करत होते, सगळं चालू होतं. जनतेच्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, पण जनतेच्या न्यायालयाने कौल दिलाय, न्याय दिला आहे. जनतेच्या न्यायालयात खरी शिवसेना कोणाची हे लोकांनी दाखवून दिलं आहे,असं म्हणत शिंदे यांनी ठाकरेंना सुनावलं.

देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, बीड धारुरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार हरले
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, बीड धारुरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार हरले.
30 वर्षांचा वनवास संपला अन् विकास कामांचा... सरोज अहिरेंची प्रतिक्रिया
30 वर्षांचा वनवास संपला अन् विकास कामांचा... सरोज अहिरेंची प्रतिक्रिया.
शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय
शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय.
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.