Vaibhav Sooryavanshi न्यूझीलंड विरुद्ध फ्लॉप पण छोट्या भावाने मात्र मैदान गाजवलं, Video Viral
Ashirwad Sooryavanshi Century: वैभव सूर्यवंशीचा भाऊ आशिर्वाद सूर्यवंशीने आता मैदान गाजवलं आहे. एकीकडे वैभव फ्लॉप होत असला तरीही आर्शिवाद मात्र मैदान गाजवत आहे.

Vaibhav Sooryavanshi IND vs NZ 3rd T20: वैभव सूर्यवंशी न्यूझीलंड दौऱ्यावर असून दुसऱ्या टी२० सामन्यात तो अवघ्या ४ धावांवर बाद झाला. मात्र, त्याचा भाऊ, आशीर्वाद सूर्यवंशी, धुमाकूळ घालत आहे. आशीर्वादने १०७ धावांचे शतक झळकावून आपल्या संघाला २ गडी राखून विजय मिळवून देण्यात मोलाचा हातभार लावला. आशीर्वादचे वडील, संजीव सूर्यवंशी यांनी सोशल मीडियावर धावफलक शेअर केला.
आशीर्वादने ८७ चेंडूंमध्ये नाबाद १०७ धावा करून एकहाती आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याने या खेळीत १४ चौकार आणि ४ षटकार मारले. विशेष म्हणजे, आशीर्वादच्या संघातील १० खेळाडूंपैकी इतर ९ फलंदाज २० धावांपर्यंतही पोहोचू शकले नाहीत. उज्ज्वल सूर्यवंशीने इन्स्टाग्रामवर आशीर्वादच्या फलंदाजीचा आणि शतक साजरे करण्याचा व्हिडिओ शेअर केला. वैभवने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आशीर्वाद भारतीय क्रिकेटमध्ये हळूहळू आपले नाव कमावत आहे, ज्यामुळे त्याला वैभवची पुढची आवृत्ती म्हटले जात आहे. त्यांच्या खेळण्याच्या शैली वेगवेगळ्या आहेत. वैभव डावखुरा फलंदाज आहे आणि फिरकी गोलंदाजीही करतो, तर आशीर्वाद उजव्या हाताचा फलंदाज असून मध्यमगती गोलंदाजी करतो.
दुसरीकडे, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दुखापतग्रस्त इशान किशनच्या जागी वैभव सूर्यवंशीला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले होते, परंतु तो केवळ ४ धावाच करू शकला. बीसीसीआयने नुकतेच एक निवेदन जारी करून सांगितले की, वेलिंग्टन येथे होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यातूनही इशान किशन बाहेर झाला आहे. परिणामी, वैभव सूर्यवंशी तिसऱ्या सामन्यातही खेळू शकतो. अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्याला कुमार कुशाग्रकडून कडवी स्पर्धा मिळण्याची शक्यता आहे.
आता भारत आणि न्यूझीलंड तिसरा टी-२० सामना उद्या रंगणार आहे. या सामन्यात वैभवकडे विशेष लक्ष असणार आहे. कारण दुसऱ्या सामन्यात फ्लॉप ठरलेला वैभव तिसऱ्या सामन्यात काहीतरी पराक्रम करेल अशी अपेक्षा सर्वजण व्यक्त करत आहे. शिवाय वैभव दर फ्लॉप झाला तर पुन्हा त्याला संधी मिळेल की नाही याची शाश्वची देता येते नाही.