AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मनोज जरांगेंनी टाकला आणखी एक मोठा बॉम्ब; सरकारचं टेन्शन वाढणार, आता थेट..

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेमध्ये एक ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या ऑडिओ क्लिपमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी मोठा दावा केला आहे.

मोठी बातमी! मनोज जरांगेंनी टाकला आणखी एक मोठा बॉम्ब; सरकारचं टेन्शन वाढणार, आता थेट..
Manoj Jarange PatilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 26, 2026 | 3:14 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेमध्ये एक ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या ऑडिओ क्लिपमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. मनोज जरांगे पाटील यांना देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा दावा या कथित ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला होता. ही ऑडिओ क्लिप राज्यात सध्या चर्चेचा विषय बनलेली असतानाच आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आणखी एक मोठा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात चर्चा थांबलेली नाही, संपूर्ण शब्द न शब्द ऐकत आहे, आणि तपास सुरूच राहणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे, तसेच आपल्याकडे आणखी चार ऑडिओ क्लिप असल्याचा दावा देखील यावेळी त्यांच्याकडून करण्यात आला आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? 

चर्चा थांबलेली नाही संपूर्ण शब्द न शब्द ऐकत आहे, आणि तपासही सुरू आहे.  ऑडिओ क्लिप AI ने बनवलेली आहे, असा गैरसमज पसरवत आहेत. पण त्याचा काहीही परिणाम होणार नाही. अल्टीमेटम देत नाही परंतु त्यांची नीतिमत्ता तपासत आहे. माझ्याकडे अणुबॉम्ब आहे, माझ्याकडे  चार क्लिप आहेत, त्या हळूहळू बाहेर काढणार आहे.  लोकांना आता सगळं कळतं ती AI ने बनवलेली क्लिप नाही, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

गैरसमज पसरतो का? हे त्यांच्याकडून पाहिलं जात आहे.  AI म्हणून प्रयोग सुरू आहे, पण आता त्याचा उपयोग होणार नाही. तुमचं माझ्याकडे खुप काही आहे. देवेंद्र फडणवीस कोणाला पाठीशी घालतात असं सध्या तरी वाटत नाही, त्यांना ही माहिती नसावी‌. भाजप संपवून पाहतायेत का? असं ते म्हणतायेत, म्हणजे यांच्या मागे मोठ्या संस्थेंची ताकद वाटते, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आता मोठा दावा करण्यात आला आहे, आपल्याकडे आणखी चार ऑडिओ क्लिप असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Follow Us
आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान
Tulja Bhavani Temple : आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान; तुळजापुरात भक्तीमय वातावरण
मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली
Mumbai Local Train Update : मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली; चाकरमान्यांचे हाल
महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा
Raj Thackeray : महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… राज ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा; नेमकं काय म्हणाले?
तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल
Raj Thackeray : तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल; शहरांच्या नियोजनावर संताप
पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील..
Mallikarjun Kharge : पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील वक्तव्याने राजकीय वाद पेटला
शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा
Manoj Jarange Patil : शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा; ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापलं
मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल....
Mumbai Local Update : मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल 30 ते 45 मिनिटे उशिराने
500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
Sanjay Shirsat : 500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे....
Ramdas Kadam : मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली
SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; जरांगे प्रकरणावरून राऊतांचा....
Sanjay Raut : SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; मनोज जरांगे प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल