
Varun Chakravarthy Net Worth: भारतीय क्रिकेट संघाचा प्रतिभावान स्पिनर वरुण चक्रवर्ती याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या लीग टप्प्यातील अंतिम सामन्यात दमदार कामगिरी केली. सामन्यात मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त वरुण याच्याच कामगिरीची चर्चा रंगली आहे. दमदार खेळी खेळत वरुण याने एकाच सामन्यात 5 विकेट घेतले. वरुणच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारताने 44 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. त्यामुळे वरुण भारतीय क्रिकेट संघासाठी किती महत्त्वाचा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
क्रिकेटच्या मैदानावर एकापेक्षा एक विक्रम रचत असताना, वरुण याच्या कमाईत देखील मोठी वाढ होत आहे. वरुण कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. शिवाय त्याच्याकडे महागड्या गाड्या देखील आहेत. आयपीएलमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आणि ब्रँडच्या जाहिरातींमुळे त्याच्या संपत्तीमध्ये 2025 पर्यंत वाढ झाली आहे. वरुण चक्रवर्तीची एकूण संपत्ती किती आहे आणि त्याच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत कोणते आहेत ते जाणून घेऊ…
वरुण चक्रवर्थीची नेट वर्थच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, त्याच्याकडे अंदाजे 40 ते 45 कोटींची संपत्ती आहे. क्रिकेटचा पगार, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) करार, ब्रँड एंडोर्समेंट आणि जाहिरातींचे करार हे त्याच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. सांगायचं झालं तर, वरुणच्या लोकप्रियतेसोबतच त्याच्या कमाईही प्रचंड झाली आहे.
आयपीएलमध्ये देखील वरुण याने दमदार कामगिरी केली. वरुण याने 2019 मध्ये किंग्स इलेवन पंजाब संघासोबत सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या सॅलरीमध्ये मोठी वाढ होत गेली. 2019 मध्ये वरुण याला किंग्स इलेवन पंजाबने 8.4 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं.
2020 मध्ये कोलकाता नाइट राइडर्स (KKR) ने 4 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं. त्यानंतर कोलकाता नाइट राइडर्स संघाने वरुण याला 8 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवलं. त्यानंतर 2023 मध्ये देखील वरुण कोलकाता नाइट राइडर्स संघाकडून खेळला. यासाठी संघाने वरुण याला 12 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवलं.
आयपीएलमधील आतापर्यंतची वरुण याची एकूण कमाई 60 कोटींच्या जवळपास पोहोचली आहे, ज्यामुळे आयपीएरल वरुण याच्या कमाईचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे असं म्हणायला हरकत नाही.
वरुण चक्रवर्ती बीसीसीआयच्या वार्षिक करारांतर्गत येतो, ज्यामुळे त्याला दरवर्षी ठराविक रक्कम मिळते. टेस्ट मॅचसाठी वरुण याला एका मॅचसाठी 15 लाख रुपये मिळतात. वनडे मॅचसाठी त्याला 6 लाख रुपये मिळतात. टी20 साठी वरुण याला 3 लाख रुपये मानधन मिळतं.
रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी यांसारख्या देशांतर्गत स्पर्धा खेळण्यासाठी देखील वरुण याला मानधन मिळतं. दिवसागणिक वरुण याची लोकप्रियता वाढत आहे. एवढंच नाही तर, दमदार कामगिरी केल्यानंतर वरुण याला बीसीसीआय आणि स्पॉन्सर्सकडून वेगळं बोनस देखील मिळतं.
वरुण चक्रवर्ती अनेक ब्रँड्सच्या प्रमोशनमधूनही चांगली कमाई करतो. तो Loc आणि Asics चा ब्रँड ॲम्बेसेडर आहे याशिवाय त्याला आयपीएलमधील क्रिकेटशी संबंधित कंपन्यांच्या आणि इतर ब्रँडच्या जाहिरातींमधूनही मोठी रक्कम मिळते.