VIDEO : रस्त्यावर लहान मुलानं दाखवला पराक्रम, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ, चर्चा तर होणारच

| Updated on: Aug 10, 2022 | 7:44 AM

महिंद्रा यांचा हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचला आहे. 4,500 हून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे आणि 36 हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. हे पाहणाऱ्यांची संख्या 552 हजारांच्या पुढे.

VIDEO : रस्त्यावर लहान मुलानं दाखवला पराक्रम, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ, चर्चा तर होणारच
Anand Mahindra Viral Tweet
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांना खेळात खूप रस आहे. आनंद महिंद्रा हे नेहमी  ट्विटरवर (Twitter) खेळाशी संबंधित पोस्ट (Post) करत असतात. अशीच एक पोस्ट त्यांनी मंगळवारी शेअर केली. या पोस्टमध्ये महिंद्रा यांनी नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. यासोबतच त्यांनी एका मुलाचा व्हिडिओ शेअर करून त्या मुलाला पुढे आणण्याबाबत बोलले आहे. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मुल रस्त्याच्या वेगवेगळ्या उड्या मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ ट्विट करत महिंद्रा यांंनी लिहिले आहे की, ‘CWG 2022 मध्ये सोन्याच्या पावसानंतर टॅलेंटची पुढची पिढी तयार केली जात आहे. याचे समर्थन कोणी करत नाही. आम्हाला या प्रतिभेचा वेगवान मागोवा घ्यावा लागेल.’ महिंद्रा यांनी  त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, त्रिरुनेलवेली गावाजवळ असलेल्या एका मित्रानं हा व्हिडीओ त्यांना पाठवला आहे. महिंद्रा यांचा हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचला आहे. 4,500 हून अधिक लोकांनी ते रिट्विट केले आहे आणि 36 हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. हे पाहणाऱ्यांची संख्या 552 हजारांच्या पुढे गेली आहे.

महिंद्रा यांचं ट्विट

नीरज चोप्राच्या ट्विटवर आनंद व्यक्त केला

नीरज चोप्रा दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत खेळला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं अप्रतिम कामगिरी करत 90 मीटरचा टप्पा ओलांडत सुवर्णपदक पटकावले. या यशाबद्दल नीरजने अर्शदचे अभिनंदन केले. महिंद्रा यांनी यावर आनंद व्यक्त केला आणि जग असे असले पाहिजे असे लिहिले आहे. या भाऊबंदकीसाठी त्यांनी दोन्ही खेळाडूंना सुवर्णपदक मिळवून दिल्याची चर्चा होती. महिंद्रा यांनी नीरजच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करताना लिहिले. “जग हे असेच असावे. स्पर्धात्मकता आणि शत्रुत्व यातील फरक सांगितल्याबद्दल दोघांना सुवर्णपदक.”

महिंद्रा यांचं ट्विट

व्हिडीओ नेमका कुठला?

त्रिरुनेलवेली गावाजवळ असलेल्या आनंद महिंद्रा यांच्या एका मित्रानं हा व्हिडीओ त्यांना पाठवला आहे. महिंद्रा यांचा हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचला आहे. 4,500 हून अधिक लोकांनी ते रिट्विट केले आहे आणि 36 हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. हे पाहणाऱ्यांची संख्या 552 हजारांच्या पुढे गेली आहे.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मुल रस्त्याच्या वेगवेगळ्या उड्या मारताना दिसत आहे. त्याचं हे कौशल्य वाखण्याजोगं आहे. आता त्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पहावं लागेल.