…म्हणून मोदींच्या आवाहनानंतरही विराट कोहली मतदान करणार नाही

| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच देशभरातील सर्व सेलिब्रेटींना मतदान करण्याचे आवाहन केले होते. तसेच आयकॉन मंडळींनी 130 कोटी भारतीयांनाही मतदान करण्याचं आवाहन करावं, असं मोदी म्हटले होते. या आयकॉनच्या यादीत भारतीय क्रिकेटर कर्णधार विराट कोहलीचेही नाव आहे. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विराट मतदान करु शकणार नाही. मुंबईतून विराट कोहलीला मतदान करण्याची ईच्छा आहे. विराटने […]

...म्हणून मोदींच्या आवाहनानंतरही विराट कोहली मतदान करणार नाही
Follow us on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच देशभरातील सर्व सेलिब्रेटींना मतदान करण्याचे आवाहन केले होते. तसेच आयकॉन मंडळींनी 130 कोटी भारतीयांनाही मतदान करण्याचं आवाहन करावं, असं मोदी म्हटले होते. या आयकॉनच्या यादीत भारतीय क्रिकेटर कर्णधार विराट कोहलीचेही नाव आहे. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विराट मतदान करु शकणार नाही.

मुंबईतून विराट कोहलीला मतदान करण्याची ईच्छा आहे. विराटने मतदानासाठी ऑनलाईन अर्ज केला. पण विराटने खूप उशिरा अर्ज केला होता. 30 मार्च फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती आणि विराटने 7 एप्रिलला अर्ज केला होता. यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणूक 2019 मध्ये विराट कोहलीला मतदान करता येणार नाही.

“विराट कोहलीचा अर्ज मिळाला आहे. मात्र आम्ही तो थांबवून ठेवला आहे. विराट सध्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करु शकत नाही. कारण खूप उशीर झाला आहे. यामुळे आमच्याकडे त्याचा अर्ज थांबवून ठेवण्यात आला आहे. येणाऱ्या निवडणुकीसाठी त्याच्या अर्जाचा विचार केला जाईल”, असं निवडणूक अधिकारी म्हणाले.

विराट कोहलीने आपल्या नावाचा मतदार यादीत समावेश करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याच्या सहकाऱ्यांनी अनेका कॉल करुन विराटच्या नावाचा मतदार यादीत समावेश झाला का?, या बद्दल अनेकदा विचारणा केली. त्यावेळी आम्ही त्यांना समजवले की, विराटने मतदान अर्ज खूप उशिरा भरला असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्याचे नाव नाही.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 मार्चला विराट कोहलीला मतदान करण्याचे आवाहन केले होते. मतदान अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च होती. विराटने 7 एप्रिलला मतदानासाठी अर्ज केला होता.