Virat Kohli: तो भारतात सुपरस्टार आहे…वनडे मालिकेपू्र्वी विराट कोहलीबद्दल किवीच्या गोलंदाज असं का म्हणाला?
Virat Kohli IND vs NZ ODI Squad: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिकेला आता सुरुवात होणार आहे. यापूर्वी आता किवीच्या गोलंदाजाने एक विधान केले आहे.

IND vs NZ ODI: भारत न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिका संपली असून आता वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा जोरदार सराव करत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माचे नेटमधील सराव करतानाचे अनेक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. विराट आणि रोहितच्या पुनरागमनासाठी सगळेच चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. आता या मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या गोलंदाजाने विराट कोहलीबद्दल एक विधान केले आहे.
जेकब डफी विराट कोहली काय म्हणाला?
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफी, म्हणाला की, “एक स्टार खेळाडू असूनही, तो एक खूप साधा माणूस आहे आणि आगामी एकदिवसीय मालिकेत त्याचा सामना करणे खूप छान वाटेल. मला काल त्याला भेटण्याची संधी मिळाली. तो जिममध्ये होता, त्यामुळे तिथे त्याला अनपेक्षितपणे भेटून खूप छान वाटले. तो आपल्या देशात सुपरस्टार आहे, त्याने इतके नम्रपणे आम्हा सर्व परदेशी खेळाडूंचे आरसीबीमध्ये स्वागत करणे हे खूप छान होते. आरसीबीसाठी खेळत असताना मी त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर केली आहे, त्यामुळे त्याच्याविरुद्ध खेळायला खूप मजा येईल.”
डफी म्हणाला, “त्याची कामाप्रती असलेली निष्ठा आश्चर्यकारक आहे. मी नेटमध्ये त्याच्याविरुद्ध खूप गोलंदाजी केली आहे, कारण तो नेहमी नेटमध्ये सराव करणारा पहिला फलंदाज असायचा आणि मी पहिला गोलंदाज. आम्ही नेटमध्ये खूप वेळ एकत्र घालवला आहे, ही एक खूप चांगली गोष्ट आहे. त्याला माझा खेळही चांगलाच माहीत आहे, त्यामुळे त्याने नक्कीच चांगली तयारी केली असणार.”
भारत न्यूझीलंड यांच्यात वनडे सामन्यांच्या मालिकेला ४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून १५ नोव्हेंबरला संपणार आहे. या मालिकेत पाच वनडे असणार आहे. यानंतर भारतीय संघ कसोटी सामना खेळणार आहे. दोन कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे. भारतीय संघाने टी-२० मालिका तर जिंकली आहे, आता उर्वरित दोन मालिकेत कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.