AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : मॅक्सवेलची दमदार खेळी, सेहवागने बघता बघता प्रिती झिंटाला ट्रोल केलं!

मॅक्सवेलची खेळी पाहून प्रितीच्या तोंडी 'ओ बेटा जी.....' हे गीत नक्कीच असेल, असं सेहवागला सुचवायचं आहे. (Virendra Sehwag Share A Funny Meme Glenn Maxwell Inning troll Preity Zinta)

IPL 2021 : मॅक्सवेलची दमदार खेळी, सेहवागने बघता बघता प्रिती झिंटाला ट्रोल केलं!
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Apr 19, 2021 | 8:03 AM
Share

मुंबई :  आयपीएलच्या (IPL 2021) 10 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 38 धावांनी विजय मिळवला. बंगळुरुकडून ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) फलंदाजीत चमकदार कामगिरी केली. ग्लेन मॅक्सवेलने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात 49 चेंडूत 78 धावा फटकावल्या. त्याची ही खेळी पाहून भारताचा दिग्गज माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) खूष झालाय. सेहवागने एक मजेशीर ट्विट करत मॅक्सवेलचं कौतुक केलं आणि बघता बघता पंजाब संघाची मालकीन प्रिती झिंटाला (Preity Zinta) ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. (Virendra Sehwag Share A Funny Meme Glenn Maxwell Inning troll Preity Zinta)

मॅक्सवेलची कोलकाताविरुद्ध धमाकेदार खेळी

बंगळुरुच्या दोन विकेट्स लवकर पडल्यानंतर क्रीजवर ग्लेन मॅक्सवेलने पाऊल ठेवलं. त्याने सुरुवातीपासून अतिशय व्यवस्थित खेळ केला. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात त्याने 9 चौकार आणि 3 षटकारांसह 49 चेंडूत 78 धावा फटकावल्या. ए बी डिव्हिलियर्सच्या साथीने त्याने शानदार खेळी केली. त्याची ही खेळी पाहून सेहवागला आनंद अनावर झाला. सेहवागने एक ट्विट करत मॅक्सवेलचं कौतुक केलं आहे.

सेहवागकडून प्रितीला ट्रोल करण्याचा प्रयत्न

सेहवागने ‘लुडो’ या चित्रपटात वापरण्यात आलेल्या ‘अलबेला’ चित्रपटातील गाण्याद्वारे मॅक्सवेलच्या आयपीएलमधील याअगोदरच्या संघांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. मॅक्सवेलची खेळी पाहून प्रितीच्या तोंडी ‘ओ बेटा जी…..’ हे गीत नक्कीच असेल, असं सेहवागला सुचवायचं आहे. याचसोबत कॅप्शनमध्ये सेहवागने लिहिलं आहे की, “अखेर मॅक्सवेलला आयपीएलमध्ये त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करताना पाहून आनंद झाला”.

मॅक्सवेलचं आयपीएल 2021 मध्ये थाटात प्रदर्शन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना मॅक्सवेलने सलग दोनदा अर्धशतकी खेळी केल्या आहेत. आयपीएलमध्ये यंदा त्याने खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये 176 ( पहिल्या सामन्यात मुंबईविरुद्ध 39, दुसऱ्या सामन्यात हैदराबादविरुद्ध 59 आणि तिसऱ्या सामन्यात कोलकात्याविरुद्ध 78) धावा फटकावल्या आहेत. यंदाच्या स्पर्धेतील मॅक्सवेलचा परफॉर्मन्स पाहून कर्णधार विराट, संघातील इतर सहकारी, संपूर्ण फ्रँचायजी, तसंच क्रीडा समीक्षक त्याचं कौतुक करु लागले आहेत.

सेहवाग मॅक्सवेलला 10 कोटींची चीअरलीडर म्हणाला होता…

आयपीएल 2020 नंतर सेहवागने मॅक्सवेलला 10 कोटी रुपयांची चीअरलीडर म्हटलं होतं. आयपीएल 2020 मधील मॅक्सवेलची कामगिरी पाहून विरेंद्र सेहवागने मॅक्सवेलवर टीका केली होती. आयपीएल 2020 मध्ये मॅक्सवेलने 13 सामन्यांमध्ये केवळ 108 धावा जमवल्या होत्या. संपूर्ण स्पर्धेत तो एकही षटकार फटकावू शकला नव्हता. मॅक्सवेलचा हा परफॉर्मन्स पाहून सेहवाग म्हणाला होता की, 10 कोटींची चीअरलीडर किंग्ज इलेव्हन पंजाबला भारी पडली. मॅक्सवेल दरवर्षी असंच करतो, तो खूप कामचोर झाला आहे. तेच त्याचं रुटीन आहे. यंदाच्या (2020) सीझनमध्ये तर त्याने स्वतःचाच रेकॉर्ड मोडित काढला आहे. यालाच म्हणतात हायली पेड व्हेकेशन (Highly Paid vacation).

(Virendra Sehwag Share A Funny Meme Glenn Maxwell Inning troll Preity Zinta)

हे ही वाचा :

IPL 2021 : राहुलच्या बॅटमधून वाढदिवशी खणखणीत अर्धशतक, आथिया शेट्टी खूश, म्हणते…

IPL 2021 : पांड्या भाऊ आणि जावा-जावांचा स्वॅगच वेगळा, हॉटेलच्या गार्डनमधून डान्स, पाहा जबरदस्त Video

Shikhar Dhawan | गब्बरची जब्बर खेळी, पटकावली ऑरेंज कॅप

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...