गाढवालाही बाप बनवायचा असता तर मी बनवला असता, Wasim Akram च्या विधानामुळे खळबळ

झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवामुळे धक्का बसलेल्या वसीम अक्रमने बाबर आझमला फटकारले, 'गाढवालाही बाप बनवावा लागतो, पण तुला..'

गाढवालाही बाप बनवायचा असता तर मी बनवला असता, Wasim Akram च्या विधानामुळे खळबळ
Wasim Akram
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 29, 2022 | 8:32 AM

नवी दिल्ली : टीम इंडियाविरुद्धच्या (India) रोमांचक मॅचमध्ये पाकिस्तान (Pakistan) टीमचा पराभव झाला. त्यावेळी दोन्ही टीमकडून चांगली कामगिरी झाल्यामुळे मैदानात उपस्थित प्रेक्षकांना चांगली मॅच पाहायला मिळाली. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध (Zimbabwe) पराभव झाल्याने पाकिस्तानची टीम सेमीफायनल पर्यंत तरी पोहचणार अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या अनेक माजी क्रिकेटपटूंना धक्का बसला आहे.

पाकिस्तान टीमचा माजी गोलंदाज वसीम अक्रमने सुद्धा पाकिस्तानच्या टीमला चांगलेचं फटकारले आहे. कारण चुकीची फिल्डींग आणि चुकीच्या निर्णयामुळे पराभव झाल्याचं अक्रमने सांगितलं आहे. त्याचबरोबर शोएब मलिकला टीममध्ये घ्यायला काय अडचण होती असा सुद्धा प्रश्न अक्रमने उपस्थित केला आहे.

पाकिस्तानची मीडल ऑडर अधिक चांगली कामगिरी करत नाही. हे मी वारंवार सांगितलं होतं. पाकिस्तानच्या टीममध्ये शोएब सारखा अनुभव फलंदाज नसल्याची खंत मॅच पाहताना नक्की जाणवली हे देखील अक्रमने स्पष्ट केलं.

समजा, मी जर का कर्णधार असतो. तर शोएब मलिकला माझ्या टीममध्ये नक्की संधी दिली असती. मॅच कशी जिंकता येईल किंवा चषक कसा जिंकता येईल यासाठी मी काहीही केलं असतं. मग त्यासाठी गाढवालाही बाप बनवायचा असता तर मी बनवला असता असं अक्रमने अखेर सांगितलं.