IND vs SA: ‘विलन’नंतर हिरो ठरलेला अर्शदीप सिंह मॅच जिंकल्यानंतर काय म्हणाला…व्हिडीओ

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या साखळी सामन्यात सुद्धा गोलंदाजांना अधिक यश मिळालं नाही. त्यामुळे निवड समितीवरती सुद्धा टीका झाली होती.

IND vs SA: विलननंतर हिरो ठरलेला अर्शदीप सिंह मॅच जिंकल्यानंतर काय म्हणाला...व्हिडीओ
Arshdeep singh
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 29, 2022 | 3:24 PM

आशिया चषकात (Asia Cup 2022) गोलंदाजांच्या (Bowler) खराब कामगिरीमुळे टीम इंडियाला (team india) त्या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. त्यामुळे खेळाडूंवर जोरदार टीका झाली. अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात महत्त्वाच्या क्षणी कॅच सोडली. त्यामुळे त्याच्यावरती अधिक झाली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या साखळी सामन्यात सुद्धा गोलंदाजांना अधिक यश मिळालं नाही. त्यामुळे निवड समितीवरती सुद्धा टीका झाली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी चांगली झाल्यामुळे टीम इंडियाने मालिका जिंकली. परंतु त्यावेळी सुद्धा गोलंदाजीवरती प्रश्न उपस्थित झाले.

काल झालेल्या सामन्यात विलन ठरलेल्या अर्शदीप सिंह याने त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये तीन खेळाडूंना बाद केले, त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.

त्याची ज्यावेळी मुलाखत घेतली, त्यावेळी त्याने आम्ही परिस्थितीनुसार कामगिरी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यावेळी आमची कामगिरी खराब होती.