AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smriti Mandhana : हार्ट अटॅक येण्यापूर्वी कशी होती स्मृतीच्या वडिलांची अवस्था? Video पाहून म्हणाल…

Smriti Mandhana : स्मृती मानधना हिच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. हार्ट अटॅक येण्यापूर्वा त्यांची कशी होती अवस्था... व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Smriti Mandhana : हार्ट अटॅक येण्यापूर्वी कशी होती स्मृतीच्या वडिलांची अवस्था? Video पाहून म्हणाल...
Smriti Mandhana Father
| Updated on: Nov 26, 2025 | 12:26 PM
Share

Smriti Mandhana : संगीतकार पलाश मुच्छल आणि भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना यांचं 23 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होतं. लग्नापूर्वीच्या सर्व विधी झाल्या होत्या एवढंच नाही तर, लग्नाची तयारी देखील झाली होती. पण लग्नाच्या काही तास आधी स्मृती हिच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्याची माहिती समोर आली आणि स्मृती हिने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला… त्यानंतर स्मृती हिचे वडील श्रीनिवास मंधाना यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत असून, त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे.

श्रीनिवास मंधाना यांना हार्ट अटॅक येण्यापूर्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुलीच्या लग्नात वडील आनंदाने डान्स करत असल्याचं दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिल्यानंतर असं काही घडेल… कोणालाच वाटलं नव्हतं…

हार्ट अटॅक येण्यापूर्वी श्रीनिवास मंधाना लेकीचे लाड देखील करताना दिसले… शिवाय एका व्हिडीओमध्ये त्यांनी ‘कुडमाई’ गाण्यावर डान्स देखील केला. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये स्मृती हिचे वडील ‘ना रे ना रे’ थिरकताना दिसले… व्हिडीओमध्ये ते स्मृती हिच्यासोबत डान्स देखील करताना दिसत आहेत.

श्रीनिवास मंधाना यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना, सांगलीतील सर्वहित रुग्णालयाचे संचालक डॉ. नमन शाह म्हणाले की, रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांना डाव्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या, त्यानंतर हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे दिसू लागली. त्यामुळे त्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

कशी आहे स्मृती हिच्या वडिलांची प्रकृती?

डॉक्टरांच्या मते, त्यांच्या हृदयातील एंजाइम सामान्यपेक्षा किंचित जास्त होते, त्यामुळे त्यांना बारकाईने निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रोहन ठाणेदार यांनी केलेल्या इकोकार्डियोग्राममध्ये कोणतीही अडचण आढळली नाही. गरज पडल्यास अँजिओग्राफी देखील करावी लागू शकते. त्यांचा रक्तदाब सध्या थोडा वाढला आहे, जो लग्नाच्या घाईमुळे किंवा मानसिक ताणामुळे असू शकतो. स्मृती हिच्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?