Smriti Mandhana Palash Muchhal: लग्न पुढे ढकलण्यापासून ते फ्लर्टींचे चॅट्स, ‘त्या’ 72 तासांत नको के घडलं…
Smriti-Palash Wedding Timeline: स्मृती मानधान हिला 6 वर्षांपासून फसवत होता पलाश? लग्न पुढे ढकलण्यापासून ते पलाशच्या फ्लर्टींचे चॅट्सपर्यंत..., 'त्या' 72 तासांत नको ते घडलं..., सध्या सर्वत्र पलाश आणि स्मृती यांच्या नात्याची चर्चा...

Smriti-Palash Wedding Timeline: भारतीय क्रिकेट संघातील स्टार क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं 23 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होतं. दोघांच्या लग्नावर संपूर्ण भारताचं लक्ष होतं. कारण महिला विश्वचषक जिंकल्यानंतर स्मृती हिने नात्याची अधिकृत घोषणा केलेली होती. स्मृती हिने अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पण अचानक बातमी समोर आली की स्मृती हिचं लग्न रद्द करण्यात आलं आहे. वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे लग्न पुढ ढकलण्यात आल्याची माहिती समोर आळी… आता 72 तासांमध्ये काय काय घडलं ते जाणून घ्या…
स्मृतीने केली साखरपुड्याची घोषणा

20 नोव्हेंबर रोजी स्मृती मानधनाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक खास क्षण शेअर करण्यासाठी एक मजेदार मार्ग निवडला. स्मृतीने इंस्टाग्राम रीलद्वारे संगीतकार पलाश मुच्छलशी तिच्या साखरपुड्याची घोषणा केली.स्मृती संघातील इतर खेळाडूंसोबत ‘समझो हो ही गया…’ या बॉलिवूड गाण्यावर थिरकताना दिसली.
पलाशने मैदानात केलं प्रपोज
View this post on Instagram
21 नोव्हेंबर रोजी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, पलाशने स्मृतीच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि तिला मुंबईतील डीव्हाय पाटील स्टेडियममध्ये घेऊन गेला, जिथे महिला संघाने पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर पलाश याने स्मृती हिच्या बोटात अंगठी घातली आणि लग्नासाठी मागणी घातली…
21 नोव्हेंबर रोजी सुरु झाल्या विधी
View this post on Instagram
लग्नासाठी मागणी घातल्यानंतर हळदी समारंभाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले. स्मृती आणि पलाशच्या जवळच्या मैत्रिणींसह भारतीय महिला क्रिकेट संघ देखील हळदी समारंभात दिसला. अनेक व्हिडीओंमध्ये स्मृती आणि पलाश एकत्र डान्स करताना देखील दिसले.
लग्न पुढे ढकल्याची समोर आली माहिती
23 नोव्हेंबर रोजी प्रत्येक जण दोघांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत असताना, अचानक लग्न पुढे ढकलल्याची माहिती समोर आली. तेव्हा स्मृतीचे मॅनेजर तुहीन मिश्रा यांनी सांगितलं की, स्मृती हिच्या वडिलांची प्रकृती खालावली आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पलाश देखील पोहोचला रुग्णालयात
24 नोव्हेंबर रोजी सकाळी पलाश याची देखील प्रकृती बिघडली ज्यामुळे त्याला देखील संगली येथील एक रुग्णालयात दाखल करण्यात आलं… आता पलाश मुंबईत असून डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
स्मृतीने डिलिट केलेत सर्व व्हिडीओ
संध्याकाळपर्यंत, लग्न पुढे ढकलण्याच्या कारणांबद्दल सोशल मीडियावर अफवा पसरू लागल्या. दरम्यान, स्मृती हिने इंस्टाग्राम अकाउंटवरून पलाश याच्यासोबत असलेले सर्व फोटो आणि व्हिडीओ डिलिट केले…
पलाशच्या फ्लर्टी चॅट्सचे स्क्रीनशॉट्स
प्रकरणाला वेगळं वळण तेव्हा मिळालं जेव्हा एका रिडेट युजरे चॅट्सचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केले… यामध्ये दावा करण्यात आला आहे की, चॅट्स पलाश आणि मॅरी डी-कोस्टा नावाच्या महिलेचे आहे. पण याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. जरी अकाउंट आणि प्रोफाइल पिक्चर आता डिलीट करण्यात आला असला तरी, चॅट्स लगेचच ऑनलाइन व्हायरल झाले.

स्क्रीनशॉटवरून असं दिसून येते की हे चॅट्स मे 2025 चे आहेत. यामध्ये, पलाश नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून महिलेला एक चॅट पाठवण्यात आला आहे, ज्यामध्ये ते एकत्र पोहण्याबद्दल आणि भेटण्याबद्दल दोघांमध्ये बोलणं सुरु होतं… सध्या सर्वत्र फक्त फक्त पलाश आणि स्मृती यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.
