स्मृती मानधना हिच्या वडिलांना हार्टअटॅक, पलाश याचीही बिघडली प्रकृती, चार भिंतीत नक्की काय झालेलं? मोठी माहिती समोर
Smriti Mandhana and Palash Muchhal : स्मृती मानधना हिच्या वडिलांना हार्टअॅक आल्यानंतर चार भिंतीत नक्की काय घडलं? स्मृतीचा होणारा नवरा कुटुंबियांसोबत मुंबईत का परतला? मोठी माहिती अखेर समोर

Smriti Mandhana and Palash Muchhal : भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू स्मृती मानधना हिच्या लग्नातच वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आलं… आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, स्मृती हिच्या वडिलांनंतर होणारा पती पलाश मुच्छल याला देखील सांगलीतील एक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता पलाश याच्या प्रकृतीबद्दल त्याची आईने मोठी अपडेट दिली आहे… पलाश आता मुंबईत परतला आहे आणि आराम करत आहे… त्या पुढे म्हणाल्यी, पलाश खूप तणावाखाली आहे, ज्यामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. पलाश मुच्छल याच्या आईने दिली हेल्थ अपडेट…
पलाश याची आई अमिता मुच्छल यांनी सांगितल्यानुसार, ‘पलाश आणि स्मृतीचे वडील यांच्यामध्ये चांगले संबंध आहेत… स्मृतीपेक्षा जास्त दोघे क्लोज आहेत… स्मृती हिच्या वडिलांची प्रकृती खालावल्यानंतर सर्वातआधी पलाश याने लग्न पुढे ढकल्याचा निर्णय घेतला… जोपर्यंत काकांची प्रकृती सुधारत नाही… तोपर्यंत लग्न होणार नाही… असं पलाश म्हणालेला…’
View this post on Instagram
‘हळद लागल्यानंतर पलाश याला आम्ही बाहेर जाऊ दिलं नाही… रडत असताना त्याती प्रकृती अचानक बिघडली… 4 तास त्याला रुग्णालयात ठेवण्यात आलं.. IV ड्रिप लावण्यात आली, ECG देखील करण्यात आला… सर्वकाही नॉर्मल आहे आणि तणाव जास्त आहे…’
पलाशच्या आईने सांगितले की, वधूच्या वडिलांच्या अचानक आजारपणानंतर स्मृती आणि पलाश यांचं लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. अमिता म्हणाल्या, ‘ सध्या पलाश आणि स्मृती दोघे देखील खचलेले आहेत… पलाश याला आम्ही मुंबईत आणलं आहे… आता त्याची प्रकृती स्थिर असून, तो आराम करत आहे… ‘ सध्या सर्वत्र पलाश आणि स्मृती यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, 2019 पासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं. 23 नोव्हेंबर रोजी दोघांचं लग्न होणार होतं. ज्या मैदानावर स्मृती हिने वर्ल्डकपची ट्रॉफी हातात घेतली, त्याच मैदानावर पलाश याने स्मृतीला लग्नासाठी प्रपोज केला.
