AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T-20 स्क्वॉडमध्ये कोण कोण? या तारखेला टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यर, वैभव सूर्यवंशी यांचे चमकणार नशीब?

Team India: भारत या महिन्याच्या अखेरीस आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल होईल. या दरम्यान BCCI शनिवारी, 6 जून रोजी टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यर आणि वैभव सूर्यवंशी यांचे नशीब चमकणार? काय आहे मोठी अपडेट?

T-20 स्क्वॉडमध्ये कोण कोण? या तारखेला टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यर, वैभव सूर्यवंशी यांचे चमकणार नशीब?
श्रेयस अय्यर, वैभव सूर्यवंशी यांचे चमकणार नशीब? Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 05, 2026 | 10:14 AM
Share

Team India: भारतीय क्रिकेट संघ आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर जात आहे. BCCI शनिवारी, 6 जून रोजी टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोनुसार, स्क्वॉड्च्या घोषणेसह टीम इंडिया नवीन कर्णधार ही जाहीर करेल. माहितीनुसार निवडकर्ते सध्याच्या टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला संधी देण्याची शक्यता कमी आहे. यादवच्या नेतृत्वात भारताने 2026 मधील टी20 विश्वकप जिंकला होता. त्याच्या जागी आता श्रेयस अय्यर याला नवीन कर्णधार म्हणून संधी मिळू शकते. तर त्याच्यासोबतच उपकर्णधारही बदलण्याची शक्यता आहे. अक्षर पटेल हा टीम इंडियाचा उपकर्णधार असू शकतो. याशिवाय वैभव सूर्यवंशी याचे नशीबही चमकू शकते. आयपीएल 2026 मध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केल्याने सीनियर टीममध्ये त्याची पहिल्यांदाच वर्णी लागण्याची शक्यता आहे.

श्रेयस अय्यरला मोठी संधी

धमाकेदार खेळाडू श्रेयस अय्यर याला भारताच्या टी20I कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव यांची जागा घेतील. तर वैभव सूर्यवंशी याला पहिल्यांदाच संघात स्थान मिळणार आहे. राष्ट्रीय निवडकर्ते 2028 मध्ये लॉस एन्जिल्स ऑलम्पिक आणि ऑस्ट्रेलियासोबतच न्यूझीलँडमध्ये होणाऱ्या टी20 विश्वकपसाठी सुद्धा तयारी करत आहेत. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी T20I टीमची गोषणा शनिवारी होण्याची दाट शक्यता आहे. मार्च महिन्यात सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात T20 विश्वकप जिंकल्यानंतर भारत आता T20I खेळणार आहे.

सूर्यकुमार यादव याचे केवळ कर्णधारपदच जाणार नाही, तर त्याला या संघातही स्थान मिळण्याची आशा धूसर झाली आहे. त्याच्यावरून 2026 T20 विश्वकपनंतरच वाद सुरू झाला होता. त्याने या विश्वकपमध्ये 136.72 या स्ट्राईक रेटने 242 धावा काढल्या होत्या. तर IPL 2026 मध्ये त्याला कामगिरी सुधारता आली नाही. 13 सामन्यात त्याने 20.76 च्या सरासरीने 147.54 च्या स्ट्राईक रेटने केवळ 207 धावा काढल्या.

तर वैभव सूर्यवंशी याला सचिन तेंडुलकर यांच्यानंतर कमी वयाचा खेळाडू म्हणून पहिल्यांदाच संधी मिळू शकते. त्याने आयपीएल 2026 च्या हंगामात 237.30 च्या स्ट्राईक रेटने या दमदार खेळाडूने 776 धावा काढल्या. आयर्लंड आणि इंग्लंड च्या T20I दौऱ्यापूर्वी सूर्यवंशी हा 9 ते 21 जूनपर्यंत श्रीलंकेमध्ये इंडिया A साठी एक मालिकेत खेळेल. यामध्ये अफगाणिस्तानचा संघ सुद्धा सहभागी आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...