AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya : टीम इंडियाला लागोपाठ दुसरा झटका? विराट नंतर हार्दिक पांड्याचाही पत्ता होणार कट? मोठं कारण समोर

India T20 Squad, Hardik Pandya : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला टी-20संघातून वगळलं जाऊ शकतं. पांड्याला वगळण्यामागे दुखापत किंवा कामगिरी हे कारण नाही, तर त्यामागे एक अधिक गंभीर हेतू आहे.

Hardik Pandya : टीम इंडियाला लागोपाठ दुसरा झटका? विराट नंतर हार्दिक पांड्याचाही पत्ता होणार कट?  मोठं कारण  समोर
हार्दिक पंड्याला टीम इंडियातून वगळणार ?
| Updated on: Jun 04, 2026 | 12:55 PM
Share

Hardik Pandya, India Squad : आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड 6 जून रोजी होणार आहे. मात्र यावेळी टीम इंडियाला मोठा झटका बसू शकतो. मात्र, या दौऱ्यांसाठी भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची निवड होण्याची शक्यता कमी दिसते. हार्दिक पांड्याला टी-20 संघातून वगळलं जाऊ शकतं. त्याला टी-20 संघातून वगळण्यामागे भारतीय निवडकर्त्यांचा हेतू वनडे वर्ल्डकपशी संबंधित आहे. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत खेळणार असून, तेथील वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. त्यामुळे, पांड्याला शक्य तितक्या जास्त एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळवण्यावर निवड समितीचं लक्ष केंद्रित आहे.

हार्दिक टी-20 संघातून का होणार बाहेर ?

अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी हार्दिक पांड्याची निवड झाली आहे. या एकदिवसीय मालिकेत संपूर्ण लक्ष हार्दिक आणि त्याच्या कामगिरीवर असेल. हार्दिक पांड्याच्या फलंदाजीच्या कामगिरीवर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तो त्याच्या कोट्यातील पूर्ण 10 ओव्हर्स षटके टाकू शकतो की नाही यावर निवड समितीचं बारकाईने लक्ष असेल. त्याला दुखापतीपासून वाचवत 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी तयार करण्याचे भारतीय निवड समितीचं ध्येय आहे.

हार्दिक पंड्या आणि दुखापती

हार्दिक पांड्यासाठी दुखापती ही एक मोठी डोकेदुखी ठरते. आयपीएल 2026 दरम्यान त्याला पाठीच्या दुखण्याचा त्रास झाला, ज्यामुळे त्याला साखळी फेरीतील चार ते पाच सामने गमवावे लागले. दुखापतीमुळे आयपीएल 2026 पूर्वीही तो अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि मालिकांना मुकला होता. आशिया कप 2025 स्पर्धेच्या मध्यातूनच हार्दिक पांड्याला माघार घ्यावी लागली. त्याच दुखापतीतून सावरू न शकल्यामुळे आशिया कप 2025 नंतर होणारा ऑस्ट्रेलिया दौराही त्याला गमवावा लागला.

पुनरागमन करत जिंकवला T20 वर्ल्डकप

मात्र, आशिया कप 2025 मध्ये झालेल्या दुखापतीतून परतल्यानंतर, हार्दिक पांड्याने टी-20 वर्ल्डकप 2026 मध्ये भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. टी-20 वर्ल्डकपच्या नऊ डावांमध्ये हार्दिक पांड्याने 160.74 च्या स्ट्राईक रेटने 217 धावा केल्या. त्याने गोलंदाजी करताना नऊ बळीही टिपले.

हार्दिकच्या जागी कोणता खेळाडू ?

2026 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताला विजय मिळवून दिल्यानंतर, हार्दिक पांड्याला आयपीएल 2026 दरम्यान पुन्हा दुखापत झाली आणि तो सध्या दुखापतीतून सावरत आहे. 2027 चा एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून, निवड समिती हार्दिकला टी-20 क्रिकेटपासून दूर ठेवणार आहे. त्यामुळेच आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांमध्ये त्याचा सहभाग होण्याची शक्यता कमी आहे. हार्दिकच्या अनुपस्थितीत, शिवम दुबे आणि नितीश रेड्डी यांचा आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांसाठीच्या टी-20 संघात अष्टपैलू म्हणून समावेश केला जाऊ शकतो.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...