वनडे वर्ल्डकपमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार ? युवराज सिंग स्पष्टच म्हणाला…

| Updated on: Mar 25, 2023 | 4:01 PM

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीला ग्रहण लागल्याचं दिसलं. सलग तीन सामन्यात शून्यावर बाद झाल्याने त्याच्या वनडे कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे.

वनडे वर्ल्डकपमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार ? युवराज सिंग स्पष्टच म्हणाला...
सूर्यकुमार यादव याच्या 'गोल्डन डक' खेळीवर युवराज सिंग याने दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाला...
Image Credit source: PTI And BCCI
Follow us on

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमार यादव सलग तीन वेळा शून्यावर बाद झाला. त्यानंतर त्याच्या वनडे संघातील अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. टी 20 क्रिकेटमध्ये नंबर वन असलेल्या सूर्यकुमारची खेळी पाहून त्याच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी सूर्यकुमार यादव याला संधी देण्यात आली आहे. मात्र चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव सपशेल फेल ठरल्याचं दिसलं आहे. पण माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनं त्याची पाठराखण केली आहे. युवराज सिंगने एक ट्वीट करून सूर्यकुमार यादवला पाठिंबा दिला आहे.

“प्रत्येक खेळाडू त्याच्या कारकिर्दीत अशा प्रसंगातून जातो. आम्ही त्याचा चांगल्या प्रकारे अनुभव घेतला आहे. माझा सूर्यकुमार यादववर विश्वास आहे. तो वनडे वर्ल्डकपमध्ये चांगली खेळी करेल. जर त्याला संधी मिळाली तर. आपण त्याला पाठिंबा दिला पाहीजे. कारण सूर्य पुन्हा उगवतो.”, असं युवराज सिंगने ट्वीट सांगितलं आहे.

“तो या मालिकेत फक्त तीन चेंडू खेळला आहे. त्यात किती लक्ष घालायचं हे मला माहिती नाही. त्याला तीन चांगल्या चेंडूंचा सामना करावा लागला. आज तसा चेंडू नव्हता. त्याने पुढे जायला हवं होतं. त्याला चांगलं माहिती आहे. तो स्पिनला चांगला खेळतो. गेल्या दोन तीन वर्षात आम्ही पाहिलंय. हे कुणाच्या बाबतही घडू शकतं.”, असं युवराज सिंग तिसऱ्या सामन्यानंतर बोलला होता.

पहिल्या दोन सामन्यात सूर्यकुमार यादव चौथ्या नंबरवर खेळला. मात्र तिसऱ्या सामन्यात त्याला सातव्या नंबरवर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं होतं. सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिन्ही वनडे मॅचमध्ये शुन्यावर बाद झाला. एका मॅचमध्ये त्याच्या बॅटने बॉलला स्पर्श केला नाही. पहिल्या दोन सामन्यात LBW तर चेन्नई वनडेत क्लीन बोल्ड झाला. सूर्यकुमार यादव क्रिकेट विश्वातील असा पहिला खेळाडू आहे, तो कुठल्या एका सीरीजमध्ये तिन्ही सामन्यात गोल्डन डक बनला.

संजू सॅमसन याला संधी मिळणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या मालिकेत मुंबईकर आणि टी 20 स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादव याची श्रेयस अय्यर याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड करण्यात आली. मात्र सूर्याला या संधीचं सोनं करता आली नाही. सूर्याने माती केली. सूर्या सपशेल अपयशी ठरला. सूर्याला तिन्ही सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. सूर्या तिन्ही सामन्यात पहिल्याच बॉलवर आऊट झाला. त्याच्यामुळे सूर्यावर टीकेची झोड उठत आहे. यामुळे सूर्याला खूप संधी दिल्या, आता उपेक्षित संजू सॅमसन याला संधी देण्यात यावी, अशी मागणी नेटकऱ्यांची आहे.