VIDEO : पाकिस्तान टीमच्या विजयानंतर दिग्गज लाईव्ह टिव्हीवर थिरकले, पाहा भन्नाट डान्स

आज इंग्लंड आणि टीम इंडिया यांच्यात दुपारी दीडवाजता मॅच होणार आहे.

VIDEO : पाकिस्तान टीमच्या विजयानंतर दिग्गज लाईव्ह टिव्हीवर थिरकले, पाहा भन्नाट डान्स
T20 World Cup 2022
Image Credit source: facebook
| Updated on: Nov 10, 2022 | 9:17 AM

नवी दिल्ली : दहा वर्षानंतर पाकिस्तान (PAK) टीम पुन्हा वर्ल्डकपच्या (T20 World Cup 2022) अंतिम सामन्यात पोहोचली आहे. काल सीडनीच्या मैदानात न्यूझिलंड (NZ) आणि पाकिस्तान यांच्यात मॅच झाली. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केल्याने न्यूझिलंडच्या खेळाडूंना मोठे फटके मारता आले नाही. तसेच न्यूझिलंडच्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी सुद्धा करता आली नाही. पाकिस्तानच्या टीमने सात गडी राखून मोठा विजय मिळविला. आज टीम इंडियाची इंग्लंड विरुद्ध मॅच होणार आहे. या सामन्यात ज्या टीमचा विजय होईल ती टीम पाकिस्तान टीमबरोबर फायनलची मॅच खेळेल.

इतक्या वर्षांनी पाकिस्तान टीम फायनलमध्ये पोहोचल्यानंतर ‘A’ स्पोर्ट्स या वाहिनी विश्लेषण करणाऱ्या दिग्गज खेळाडूंना चांगला आनंद झाला. वसीम अकरम, शोएब मलिक, मिस्बाह-उल-हक आणि वकार यूनुस या खेळाडूंनी चक्क लाईव्ह टिव्हीवर डान्स केला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.

कालच्या सामन्यात पाकिस्तान फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आहे. बाबर आझम आणि रिझवान या जोडीने चांगली खेळी केल्यामुळे पाकिस्तान टीमचा विजय झाला. तर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रीदी याने न्यूझिलंड टीमचा महत्त्वाचा फलंदाज बाद केल्यामुळे न्यूझिलंड टीम पुर्णपणे ढेपाळली.

आज इंग्लंड आणि टीम इंडिया यांच्यात दुपारी दीडवाजता मॅच होणार आहे. आजच्या सामन्यात दोन्ही टीम चांगला खेळ करतील, कारण जी टीम जिंकेल ती टीम फायनल सामना खेळणार आहे.