‘घरात वाघ अन् बाहेर मांजर…’, टीम इंडियावर गंभीर आरोप, भारतीय खेळाडूंचे पितळ उघडं पडलं

भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध मालिका जिंकली पण तरीही भारतीय खेळाडूंवर आता गंभीर आरोप होत आहे. भारतीय संघाचे पितळ आता उघडे पडले आहे.

| Updated on: Sep 20, 2026 | 10:05 AM
1 / 5
टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्ध सीरिज दणक्यात जिंकली. तिन्ही सामने भारतीय संघाने जिंकली पण तरीही भारतीय संघावर माजी वर्ल्ड कप विनर खेळाडूने आता गंभीर आरोप केला आहे.

टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्ध सीरिज दणक्यात जिंकली. तिन्ही सामने भारतीय संघाने जिंकली पण तरीही भारतीय संघावर माजी वर्ल्ड कप विनर खेळाडूने आता गंभीर आरोप केला आहे.

2 / 5

टीम इंडियाच्या या कामगिरीवर वर्ल्ड कप जिंकवून देणारे आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारताने परदेशातही अशीच कामगिरी करावी, अशी बॅटिंग फक्त आपल्या खेळपट्टीवर नाही तर बाहेरच्या खेळपट्टीवर जाऊनही केली पाहिजे."

3 / 5

"बॉल थोडा हलत असेल तर वैभव सूर्यवंशी संघर्ष करतो, हे सर्वांनीच पाहिले. आमच्या निवड समितीलाही विचार करावा लागेल, कोच आणि खेळाडूंनाही याबाबतीत विचार करावा लागेल', असे संदीप पाटील म्हणाले.

4 / 5

'फक्त घरामध्ये दादागिरी करायची माहित आहे, घरामध्ये वाघ आणि बाहेर मांजर, असे झाले नाही पाहिजे', असा आरोपम आता संदीप पाटील यांनी केला आहे.

5 / 5

भारतीय संघाची आयर्लंड-इंग्लंडविरुद्ध कामगिरी चांगली राहिली नाही. दोन्ही संघाविरुद्ध सामने हे त्यांच्या घरच्या मैदानावर होते जिथे भारतीय संघाला बराच संघर्ष करावा लागला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us