AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली

BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली

| Updated on: Sep 20, 2026 | 11:30 AM
Share

मुंबईतील कोस्टल रोडवर भरधाव BMW कारच्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

मुंबईतील कोस्टल रोडवर एका भरधाव BMW कारला भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एका 20 वर्षीय तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.

मरीन ड्राईव्हवरून हाजी अलीच्या दिशेने जाताना अति वेगामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने BMW थेट कोस्टल रोडवरून खाली कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातात गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून तिची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. गाडीचा क्रमांक DD01CC302 असून ती दादरा-नगर हवेली येथील नोंदणीकृत असल्याचे तपासणीत समोर आले आहे. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण आणि पुढील तपास सुरू आहे. वाहतूक विभागही या घटनेचा तपास करत आहे.

Published on: Sep 20, 2026 11:30 AM

Follow Us