AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग गेली तब्बल 10 किलोमीटर पेक्षा जास्त लांब

Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या मार्केटमध्ये कोळी बांधवांचा जल्लोष पहायला मिळाला. कोळी महिला लालबाग मार्केटमध्ये हळदी कुंकू कार्यक्रम करून जल्लोष करत आहेत. गणेशोत्सव काळात कोळी महिलांना लालबागच्या पूजेचा मान दिला जातो.

Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग गेली तब्बल 10 किलोमीटर पेक्षा जास्त लांब
Lalbaugcha Raja 2026
| Updated on: Sep 20, 2026 | 11:23 AM
Share

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी : कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला मोठी गर्दी उसळली आहे. दरवर्षी देशभरातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात. आज रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने लालबाग राजाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. लालबाग-परळचा परिसर भक्तांनी फुलून गेला आहे. लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग तब्बल 10 किलोमीटर पेक्षा जास्त लांब गेली आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे गणेशभक्तांनी लालबागचा राजाच्या दर्शनाला मोठी गर्दी केली आहे. लालबाग मार्केट ते भायखळा रेल्वे स्टेशन पर्यंत ही दर्शन रांग पोहचली आहे. रविवारी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची सर्वाधिक गर्दी होणार आहे. शनिवारपासूनच लालबाग, परळ, काळाचौकी परिसरात मोठी गर्दी आहे. काल काळाचौकी येथे महागणपतीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांसोबत मोठी एक दुर्घटना घडली. लालबागमध्ये आज गर्दीचं नियोजन करताना पोलीस यंत्रणेचा कस लागणार आहे.

दरम्यान लालबागच्या मार्केटमध्ये कोळी बांधवांचा जल्लोष पहायला मिळाला. कोळी महिला लालबाग मार्केटमध्ये हळदी कुंकू कार्यक्रम करून जल्लोष करत आहेत. गणेशोत्सव काळात कोळी महिलांना लालबागच्या पूजेचा मान दिला जातो. यावेळी महिला पारंपरिक वेशभूषा करून लालबागच्या राजाची पूजा करतात. या महिलांकडून मार्केटमध्ये बँडवर जल्लोष केला जात आहे.

मुंबईच्या राजाला 101 अमेरिकन डॉलरचा हार

गणेश गल्ली येथील मुंबईच्या राजाच्या पुजेच्या मूर्तीला भाविकाकडून 101 अमेरिकन डॉलरचा हार घालण्यात आला. मुंबईतील गणेशोत्सवात यंदा डॉलरच्या हारांची क्रेज आहे. याअगोदर देखील लालबागच्या राजाला एका भक्ताने डॉलरचा हार अर्पण केला होता. यंदा गणेशोत्सवात भारतीय चलन तसंच विदेशी चलन भाविकांकडून दान केले जात आहे.

लालबाग-परेल हा भाग गणेशभक्तांनी फुलून गेला

मुंबईत सर्वत्र गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पहायला मिळतोय. आज गणेशोत्सवाचा सातवा दिवस आहे. काल गौरी-गणपतीचं विसर्जन पार पडलं. आज रविवार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी घराबाहेर पडतील. कालपासून मुंबापुरीत मोठी गर्दी उसळली आहे. लालबाग-परेल हा भाग गणेशभक्तांनी फुलून गेला आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे.

Follow Us
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम