India vs New Zealand : नॉटिंगहममध्ये धुवाँधार पाऊस, दोन तास मॅच सुरु होणं कठीण

| Updated on: Jun 13, 2019 | 2:54 PM

क्रिकेट विश्वचषकात (CWC 2019) आज भारताचा सामना तुल्यबळ न्यूझीलंडशी होत आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी विश्वचषकात प्रतिस्पर्ध्यांना हरवून झोकात सुरुवात केली आहे.

India vs New Zealand : नॉटिंगहममध्ये धुवाँधार पाऊस, दोन तास मॅच सुरु होणं कठीण
Follow us on

India vs New Zealand नॉटिंगहॅम : क्रिकेट विश्वचषकात (CWC 2019) आज भारताचा सामना तुल्यबळ न्यूझीलंडशी होत आहे. सलग दोन विजयानंतर आत्मविश्वासाने भारत न्यूझीलंडशी दोन हात करेल. यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत एकही पराभव न स्वीकारलेल्या, मात्र एकही वर्ल्डकप न जिंकलेल्या न्यूझीलंडला पराभूत करुन भारत विजयी हॅटट्रिक करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

World Cup cricket score Live Update

  • नॉटिंगहममध्ये धुवाँधार पाऊस होत आहे. थांबून थांबून पावसाची मोठी सर येत आहे. त्यामुळे भारत वि न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट आहे. टॉसपूर्वी पावसाची मोठी सर आल्याने खेळपट्टीवर कव्हर अच्छादित करण्यात आलं. मात्र पावसाचा जोर इतका मोठा होता की 2 तास म्हणजे साडेचार ते पाचपर्यंत मॅच सुरु होणं कठीण आहे.

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी विश्वचषकात प्रतिस्पर्ध्यांना हरवून झोकात सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या तिन्ही लढतीत निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. तर भारताने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांना पाणी पाजलं आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असले तरीही या सामन्यापूर्वी भारताला धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे विश्वचषातून 3 आठवड्यांसाठी बाहेर पडला आहे. धवनच्या दुखापतीमुळे रोहित शर्मासोबत सलामीला के एल राहुल येणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोण करणार याबाबत उत्सुकता आहे.

दुसरीकडे न्यूझीलंड वर्ल्डकप स्पर्धेत एकही सामना जिंकला नाही. त्यामुळे न्यूझीलंडला भारत हलक्यानं घेणार नाही. भारताकडे रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्यासारखे बलाढ्य फलंदाज आहेत. न्यूझीलंडकडेही हेनरी निकोल्स, केन विल्यमसन, मार्टिन गप्टीलसारखे धोकादायक फलंदाज आहेत.

गोलंदाजांबाबत बोलायचं झाल्यास, भारताकडे जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव आहेत. तर न्यूझीलंडकडे लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, कॉलम फर्ग्युसन आणि सर्वात घातक ट्रेण्ट बोल्ट सारखे गोलंदाज आहेत. ट्रेण्ट बोल्ट भारतासाठी प्रचंड डोकेदुखी ठरु शकतो. मात्र ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कची ज्याप्रमाणे धुलाई केली, तशीच धुलाई ट्रेण्ट बोल्टची करण्यासाठी भारतीय फलंदाज सज्ज आहेत.

विराट V/S ट्रेण्ट बोल्ट
कोहलीचा न्यूझीलंड विरुद्ध वनडे मधला रेकॉर्ड चांगला आहे. पण त्याच्यासाठी सर्वात मोठा धोका हा किवी जलद गोलंदाज ट्रेण्ट बोल्ट असेल. बोल्ट कोहलीला आऊट-स्विंग आणि इन-स्विंगसहसारखे बॉल टाकून त्रास देऊ शकतो. बोल्टनं भारताविरूद्ध 12 सामन्यांत 22 विकेट घेतल्या आहेत.

रोहित शर्मा V/S टीम साऊदी
रोहित शर्मानें भारताच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक शतक तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक अर्धशतक ठोकलं आहे. पण आता रोहितचा सामना हा न्यूझीलंडचा जलद गोलंदाज टीम साऊदीशी होणार आहे. साऊदीने 2013 पासून भारताच्या टॉप-ऑर्डरविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.

हार्दिक पंड्या V/S मिशेल सँटेनर
पंड्या आणि सँटेनरमधील द्वंद्व हे बघण्यासारखं असेल. सेंटनर हा जगातील सर्वात चतुर स्पिनर्सपैकी एक आहे. न्यूझीलंडचा हा उगवता तारा आपल्या गोलंदाजीने अनेक श्रेष्ठ फलंदाजाला गोंधळवू शकतो. गेल्या दोन सामन्यांमध्ये भारताच्या गोलंदाजांनी उत्तम काम केलं आहे. तर, या सामन्यांमध्ये गोलंदाजांची ही कामगिरी पाहण्यासारखी असेल.

जसप्रीत बुमरा V/S मार्टिन गप्टिल
आपल्या क्रिकेट करिअरमधला पहिलाच विश्वकप खेळणाऱ्या बुमराचा सामना न्यूझीलंडच्या टॉप-ऑर्डर फलंदाज मार्टिन गप्टिलशी होईल. गप्टिल का न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज आहे.

कुलदीप यादव (Kuldeep Yadav) V/S केन विल्यमसन (Kane Williamson)

विल्यमसन हा स्पिन बॉलिंगवर खेळणारा चांगला खेळाडू आहे. त्यामुळे विल्यमसन आणि कुलदीप यादवमधील सामना बघणं ही मजेशीर असेल.

भारत आणि न्यूझीलंडचा विश्वचषकातील इतिहास

विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड आतापर्यंत सात वेळा आमनेसामने आले आहेत. मात्र यात चारवेळा न्यूझीलंडने बाजी मारली आहे, तर तीन वेळा भारताला जिंकता आलं. आता हिशेब चुकता करण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.