
मुंबई : शरीरसौष्ठव क्षेत्रातून एक वाईट बातमी आहे. प्रसिद्ध मराठमोळे बॉडीबिल्डर आशिष साखरकर यांचं निधन झालं आहे. आशिष साखरकर यांनी जागतिक पातळीवर अनेक मानाचे पुरस्कार मिळवले आहेत. मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, मिस्टर महाराष्ट्र किताब त्यांनी जिंकला. एका आजारपणामुळे आशिष साखरकर यांचं निधन झालं
आशिष साखरकर हे बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील मोठं आणि आदरणीय नाव होतं. आशिष साखरकर याने मायदेशात आणि परदेशात अनेक किताब जिंकले आहेत. महाराष्ट्र श्री, मिस्टर इंडिया आणि मिस्टर युनिर्व्हस असे किताब आशिष साखरकर यांच्या नावावर आहेत.
आशिष साखरकर यांनी कुठले किताब जिंकले.
चारवेळा मिस्टर इंडिया विनर
चारवेळा फेडरेशन कप विनर
मिस्टर युनिर्व्हस रौप्य आणि कांस्य पदक
मिस्टर एशिया सिलव्हर
युरोपियन चॅम्पियनशिप
शिव छत्रपती पुरस्कार
आशिष साखरकर .यांच्या निधनाच्या बातमीने शरीर सौष्ठव क्षेत्रातील अनेकजण हळहळले. बॉडी बिल्डिंगच्या चाहत्यांसाठी हा एक झटका आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही, तर भारतातही आशिष साखरकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. आशिष साखरकर यांच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टवर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.