
झहीर खान.... भारताचा माजी गोलंदाज ज्याने जागतिक क्रिकेटवर तब्बल एक दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवलं. त्याच्या जशी क्रिकेट कारकर्दीची चर्चा होते तशी त्याच्या पर्सनल लाईफची देखील सातत्याने चर्चा होत असते. झहीर खानची पत्नी सागरिका घाटगे एक गुणी अभिनेत्री आहे.

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील घाटगे घराण्यात तिचा जन्म झाला. लहाणपणापासून तिला कलेची आवड होती. तिने अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांतून काम केलं आहे. यामध्ये 'चक दे इंडिया', 'फॉक्स', 'मिले ना मिले हम' यांसारख्या हिंदी तर 'प्रेमाची गोष्ट' या मराठी चित्रपटात तिने काम केलं. तिची आणि झहीर खानची लव्ह स्टोरी इंट्रेस्टिंग आहे.

झहीर खान आणि सागरिका यांच्यातलं नातं त्यावेळी समोर आलं ज्यावेळी ते युवराज सिंग आणि हेजल यांच्या लग्नसमारंभात जोडीने पोहोचलं. तोपर्यंत केवळ त्यांच्या अफेयर्सच्या बातम्या येत होत्या.

2017 साली झहीर खान आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार होता. तेव्हा ती झहीरला चिअरअप करायला मैदानावर यायची. अनेक दिवस ते एकमेकांना डेट करायचे. अखेर नोव्हेंबर 2017 मध्ये झहीर आणि सागरिका लग्नबंधनात अडकले.

सागरिका अगोदर झहीर खान बॉलिवूड अभिनेत्री इशा इरवानीला डेट करत होता. खूप वर्ष ते रिलेशनीपमध्ये होते. 2011 च्या वर्ल्डकपवेळी त्यांच्या लग्नाच्या देखील चर्चा होत्या. मात्र सागरिका झहीरच्या आयुष्यात आल्या आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला.