एअरटेलचं दिवाळी गिफ्ट, दोन हजार रूपयांचा कॅशबॅक

मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर एअरटेलने धन्यावाद कार्यक्रमांतर्गत ग्राहकांसाठी खास फेस्टीवल ऑफर लाँच केली आहे. या ऑफर अंतर्गत एअरटेल युजर्सने नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यास, 2000 रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. हा कॅशबॅग ‘MyAirtel’ या एअरटेलच्या मोबाइल अॅपच्या माध्यामातून ग्राहकांच्या खात्यात जमा होईल. एअरटेलने प्रसिद्धीपत्रक जाहीर करून या बाबतची माहिती दिली आहे. एअरटेल ग्राहकांनी नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर …

एअरटेलचं दिवाळी गिफ्ट, दोन हजार रूपयांचा कॅशबॅक

मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर एअरटेलने धन्यावाद कार्यक्रमांतर्गत ग्राहकांसाठी खास फेस्टीवल ऑफर लाँच केली आहे. या ऑफर अंतर्गत एअरटेल युजर्सने नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यास, 2000 रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. हा कॅशबॅग ‘MyAirtel’ या एअरटेलच्या मोबाइल अॅपच्या माध्यामातून ग्राहकांच्या खात्यात जमा होईल.

एअरटेलने प्रसिद्धीपत्रक जाहीर करून या बाबतची माहिती दिली आहे. एअरटेल ग्राहकांनी नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर ग्राहकांच्या खात्यात 40 कूपन्स जमा होतील. यामध्ये प्रत्येक एका कूपनची किंमत 50 रूपये असेल. अशा प्रकारे ग्राहकांच्या खात्यात दोन हजार रूपये जमा होतील.

दोन हजार रूपयांचा कॅशबॅक कसा मिळवाल

1) एअरटेल ग्राहकांनी नवीन 4G स्मार्ट फोन खरेदी केल्यानंतर त्यामध्ये ‘MyAirtel’ डाऊनलोड करावे.

२) ‘MyAirtel’ अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुमच्या खात्यात डिजीटल स्वरूपातील 2000 रूपयांचा कॅशबॅक जमा झालेला असेल.

3) हा कॅशबॅक 40 महिन्यांपर्यंत वापरता येणार आहे.

4) या कॅशबॅकमध्ये 40 कूपन असतील. या प्रत्येक एका कूपनची किंमत 50 रूपये इतकी आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *