शाओमीच्या या फोनवर तब्बल 5000 रुपयांची सूट

मुंबई : या वर्षात शाओमीने अनेक फोन लाँच केले. प्रत्येक फोनला ग्राहकांनी मोठा प्रतिसादही दिला आहे. त्यावरच शाओमी आता ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर देत आहे. नुकतेच ऑगस्ट महिन्यात शाओमीने पोकोचा पहिला स्मार्टफोन Xiaomi poco F1 लाँच केला. हा फोन सुरुवातीला 20,999 रुपयाला विकला जात होता. यास्मार्टफोनमध्ये दमदार असे स्पेसिफिकेशन दिले आहेत. मात्र कंपनीकडून काही मर्यादीत …

शाओमीच्या या फोनवर तब्बल 5000 रुपयांची सूट

मुंबई : या वर्षात शाओमीने अनेक फोन लाँच केले. प्रत्येक फोनला ग्राहकांनी मोठा प्रतिसादही दिला आहे. त्यावरच शाओमी आता ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर देत आहे. नुकतेच ऑगस्ट महिन्यात शाओमीने पोकोचा पहिला स्मार्टफोन Xiaomi poco F1 लाँच केला. हा फोन सुरुवातीला 20,999 रुपयाला विकला जात होता. यास्मार्टफोनमध्ये दमदार असे स्पेसिफिकेशन दिले आहेत. मात्र कंपनीकडून काही मर्यादीत वेळेपर्यंत Xiaomi poco F1  स्मार्टफोनवर पाच हजारांची सूट दिली जात आहे.

पोकोच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवरुन याची घोषणा करण्यात आली आहे. शाओमी पोको एफ1 च्या किंमतीत पाच हजार पर्यंतची सूट देण्यात आली आहे. ट्वीटनुसार ही किंमत 6 डिसेंबर ते 8 डिसेंबरपर्यंतच मर्यादीत आहे. ही सूट फ्लिपकार्ट आणि मीडॉटकॉमवरही मोबाईल विकत घेताना मिळणार आहे. विशेष म्हणजे पोको एफ1 च्या फक्त 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजच्या फोनमध्ये ही सूट देण्यात येणार आहे. मात्र 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज फोनच्या किंमतीत सूट देण्यात आली नाही.

पोको एफ1 चा 8 जीबी रॅम, 256 जीबी इंटरनल स्टोरेज 28,999 रुपयांत लाँच केला होता. जर ग्राहकांना पाच हजार रुपयांची सूट मिळणार असेल तर हा फोन 23,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे.

शाओमी पोको एफ1 स्पेसिफिकेशन

  • 6.18 इंच, फुल एसडी+नॉच डिस्प्ले
  • 6 जीबी रॅम, 8 जीबी रॅम
  • 64 जीबी, 256 जीबी इंटरनल स्टोरेज
  • अॅंड्रॉईड 8.1 ऑरियो सिस्टीम
  • रिअर कॅमेरा 12+5
  • फ्रंट कॅमेरा 20 मेगापिक्सल
  • फिंग्रप्रींट सेंसर
  • बॅटरी क्षमता 4000mAh
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *