सॅमसंगच्या ‘या’ फोनवर 11510 रुपयांची सूट

मुंबई : सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 हा सर्वोत्तम असा  स्मार्टफोन आहे. हा फोन फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये तुम्ही 36 हजार 990 रुपयात खरेदी करु शकता. गॅलेक्सी नोट 8 स्मार्टफोन 2017 मध्ये लाँच करण्यात आला होता. मात्र अजूनही या स्मार्टफोनची मागणी कमी झालेली नाही. गॅलेक्सी नोट 8 (6GB+64GB) ची किंमत 47 हजार रुपये आहे. फ्लिपकार्ट शॉपिंग […]

सॅमसंगच्या या फोनवर 11510 रुपयांची सूट
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

मुंबई : सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 हा सर्वोत्तम असा  स्मार्टफोन आहे. हा फोन फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये तुम्ही 36 हजार 990 रुपयात खरेदी करु शकता. गॅलेक्सी नोट 8 स्मार्टफोन 2017 मध्ये लाँच करण्यात आला होता. मात्र अजूनही या स्मार्टफोनची मागणी कमी झालेली नाही.

गॅलेक्सी नोट 8 (6GB+64GB) ची किंमत 47 हजार रुपये आहे. फ्लिपकार्ट शॉपिंग डे सेलमध्ये हा स्मार्टफोन तुम्ही 36 हजार 990 रुपयामध्ये खरेदी करु शकता. जर तुमच्याकडे एचडीएफसी बँकचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल, तर 10 टक्क्यांचा डिस्काउंट मिळू शकतो. इंस्टंट डिस्काऊंटची मर्यादा 1 हजार 500 रुपये आहे. यामुळे गॅलेक्सी नोट 8 तुम्ही 35 हजार 490 रुपयांत खरेदी करु शकता.

गॅलेक्सी नोट 8 स्पेसिफिकेशन

या फोनमध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले आहे. तसेच क्वॉड एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये रिअर कॅमेरा 12 + 12 मेगापिक्सल दिला आहे आणि सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सल दिला आहे.

गॅलेक्सी नोट 8 मध्ये सॅमसंगचा इनहाऊस प्रोसेसर Exynos 8895 दिला आहे. तसेच यामध्ये 3300mAh ची बॅटरी दिली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये USB Type C दिला आहे आणि क्विक चार्जिंगचा सपोर्टही दिला आहे.

फ्लिपकार्ट विक शॉपिंग डे सेलमध्ये सॅमसंगच्या दुसऱ्या स्मार्टफोनवरही डिस्काऊंट मिळत आहे. गॅलेक्सी जे6 वरही सूट दिली जात आहे. फ्लिपकार्टचा हा सेल 19 मे पर्यंत सुरु आहे.