सर्वात मोठा दरोडा ! 16 अब्ज लोकांचे ॲपल आणि गूगल अकाऊंट पासवर्ड लीक

जर तुम्हीही Apple, Google आणि Facebook सारखे अकाउंट वापरत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी डेटा चोरी झाली आहे. 16 अब्ज लोकांचे पासवर्ड आणि लॉगिन क्रेडेन्शियल्स लीक झाले आहेत आणि हा सर्व डेटा ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचं अलिकडेच एका अहवालात उघड झालं आहे. अशावेळी स्वत:ला सेफ ठेवण्यासाठी काय कराल ?

सर्वात मोठा दरोडा ! 16 अब्ज लोकांचे ॲपल आणि गूगल अकाऊंट पासवर्ड लीक
तुम्हीही Apple, Google आणि Facebook सारखे अकाउंट वापरत असाल तर...
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jun 20, 2025 | 9:59 AM

Google, Apple आणि Facebook अकाउंट वापरणाऱ्या तब्बल 16 अब्ज लोकांवर एक मोठं संकट घोंगावतंय. नुकताच एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे, त्यानुसार 16 अब्ज लोकांचे पासव्रज आणि लॉग-इन क्रेडेंशिअल्स चोरण्यात आले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी आहे. गुगल, फेसबुक आणि ॲपल सारख्या कंपन्यांचे अकाउंट खरोखर सुरक्षित आहेत की नाहीत ?, हा विचार करण्यास लोकांना आता यामुळे भाग पडलं आहे.

डार्क वेबवर 16 अब्जांहून अधिक क्रेडेन्शियल्स ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहेत, असं सायबरसुरक्षा संशोधकांना आढळून आलं आहे. एक्सपर्ट्सच्या सांगण्यानुसार, जर यावर वेळीच उपाय केला गेला नाही तर लोकांना फिशिंग अटॅक, आयडी चोरी आणि त्यांच्या खात्यांवरील नियंत्रण देखील गमावावे लागू शकते.

कोणी केला डेटा लीक ?

फोर्ब्सच्या अहवालानुसार, या वर्षाच्या सुरुवातीला सुरू झालेल्या तपासात सहभागी असलेल्या संशोधकांचा असं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणात पासवर्ड लीक होण्यासाठी अनेक इन्फोस्टेलर मालवेअर जबाबदार आहेत. पासवर्ड चोरी होणं ही काही छोटी बाब नाही, त्यामुळे अनेक धोके उद्भवू शकतात. म्हणूनच आता गुगलने त्यांच्या अब्जावधी युजर्सना त्यांचे अकाउंट पासवर्ड तात्काळ बदलण्याचा आणि पासकी वापरण्याचा सल्ला दिला आहे.

कसे लीक झाले पासवर्ड ?

साइबरन्यूजच्या Vilius Petkauskas नुसार, 30 डेटासेट लीक झाले होते, त्यांच्यापैकी प्रत्येकामध्ये 3.5 अब्ज पेक्षा जास्त रेकॉर्ड होते, ज्यामुळे हा आकडा एकूण 16 अब्जांवर पोहोचला. यामध्ये गुगल, ॲपल, फेसबुक, टेलिग्राम, गिटहब आणि इतर सरकारी एजन्सींचे पासवर्ड आणि लॉग-इन क्रेडेन्शियल्सचा समावेश आहे.

स्वत:ला सेफ ठेवण्यासाठी काय करावं ?

– यामुळे तुम्ही प्रभावित झालात की नाही, हे जाणून घेणं आत्ता महत्वाचं नाहीये. आत्ताच्या घडील सर्वात महत्वाचं काम म्हणजे, तत्काळ तुमच्या अकाऊंटचा पासवर्ड बदलावा.

– पासवर्ड बदलल्यानंतरही, खात्यासाठी टू स्टेप वेरिफिकेशन हे फीचर वापरा.

– तुमचे खाते मजबूत करण्यासाठी पासवर्डऐवजी पासकी वापरणं चांगलं ठरेल.