Redmi Note 9 सिरीजमधील सर्व स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट, कमी किंमतीत ढासू फीचर्स मिळणार

| Updated on: Mar 23, 2021 | 10:59 AM

रेडमी नोट 9 प्रो मॅक्स, रेडमी नोट 9 प्रो, रेडमी नोट 9, रेडमी 9i आणि रेडमी 9 प्राइम. या स्मार्टफोन्सवर कंपनीने डिस्काऊंट सादर केला आहे.

Redmi Note 9 सिरीजमधील सर्व स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट, कमी किंमतीत ढासू फीचर्स मिळणार
Redmi Note 9 Series
Follow us on

मुंबई : रेडमी नोट 9 प्रो मॅक्स, रेडमी नोट 9 प्रो, रेडमी नोट 9, रेडमी 9i आणि रेडमी 9 प्राइमची किंमत कमी करण्यात आली आहे. या स्मार्टफोन्सवर 2000 रुपयांची सूट मिळत आहे. या सर्व सवलती या महिन्याच्या शेवटपर्यंत मिळतील. हे स्मार्टफोन अमेझॉन इंडिया (ई कॉमर्स वेबसाईट) आणि एमआय डॉट कॉमवरुन (शाओमी, रेडमीची अधिकृत वेबसाईट) ग्राहक खरेदी करू शकतात. रेडमी नोट 9 प्रो मॅक्स सध्या 2000 रुपयांच्या सवलतीच्या दरात विकला जात आहे. फोनची सुरुवातीची किंमत 14,999 रुपये आहे. (2000 Rupees discount on Redmi Note 9 Series)

रेडमी नोट 9 प्रो मॅक्सची किंमत 14,999 रुपये आहे. या किंमतीत आपल्याला 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजचा पर्याय मिळेल. त्याचबरोबर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज पर्याय असलेल्या स्मार्टफोनची किंमत 17,499 रुपये आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये 2000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. 91 मोबाईलच्या अहवालानुसार आपण 31 मार्चपर्यंत या सवलतींचा लाभ घेऊ शकता.

Redmi Note 9 आणि Redmi Note 9 Pro वर सवलत

रेडमी नोट 9 प्रो चं 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट तुम्ही 12,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. त्याच वेळी, 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 13,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यापूर्वी या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत अनुक्रमे 13,999 आणि 15,999 रुपये इतकी होती. रेडमी नोट 9 हा स्मार्टफोन 10,499 रुपयांना विकला जात आहे. यात आपल्याला 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज स्पेस मिळते.

Redmi Note 9, Redmi 9 Prime आणि Redmi 9i वर डिस्काऊंट

रेडमी नोट 9 च्या 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 12,999 रुपये इतकी आहे. तर 6 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेल 13,999 रुपयांमध्ये खरेदी करता येतील. त्याचप्रमाणे रेडमी 9 प्राइम वरही सूट देण्यात आली आहे. याची किंमत 9499 रुपये इतकी आहे, यामध्ये तुम्हाला 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज स्पेस मिळेल. तर रेडमी 9 आय च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7999 रुपये इतकी आहे.

लोकप्रिय सिरीज

रेडमी नोट 9 सिरीज भारतात खूप लोकप्रिय झाली आहे. ही एक परवडणारी सिरीज आहे ज्यात ग्राहकांना कमी किंमतीत मजबूत फीचर्स मिळत आहेत. मग ते कॅमेरा असो अथवा रॅम. या सिरिजीद्वारे ग्राहक अत्यल्प दरात शानदार फीचर्स असलेले स्मार्टफोन खरेदी करत आहेत.

इतर बातम्या

8GB/256GB, 20MP सेल्फी कॅमेरा, Poco चा नवा फोन बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार हे स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Samsung Galaxy M12 चा धुमाकूळ, अमेझॉनवर सर्वाधिक विक्री झालेल्या स्मार्टफोन्सच्या यादीत अव्वल

(2000 Rupees discount on Redmi Note 9 Series)