Samsung, Oneplus, Xiaomi, Apple च्या स्मार्टफोन्सवर 40 टक्क्यांपर्यंत सूट

तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. कारण अमेझॉनने जबरदस्त ऑफर सादर केली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:06 PM, 22 Feb 2021
Samsung, Oneplus, Xiaomi, Apple च्या स्मार्टफोन्सवर 40 टक्क्यांपर्यंत सूट

मुंबई : तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. ई-कॉमर्स जायंट अमेझॉनने 22 फेब्रुवारीपासून फॅब फोन्स फेस्टची (Fab Phones Fest) सुरुवात केली आहे. यात तुम्ही 40 टक्क्यांपर्यंतच्या सवलतीत स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक अ‍ॅक्सेसरीज खरेदी करू शकता. यात तुम्ही Samsung Galaxy M-series, OnePlus Samsung Galaxy M-series, iPhone आणि OPPO या कंपन्यांचे स्मार्टफोन खरेदी करू शकता. तसेच, नवीनच लाँच केलेले स्मार्टफोन्स Samsung M02, Samsung M02s, Redmi 9 Power आणि Mi 10i देखील खरेदी करु शकता. (Fab Phones Fest on Amazon discount up to 40 percent on samsung galaxy m series, oneplus, iphone until 25th february)

तुम्ही जर कोटक बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याद्वारे ईएमआय ट्रान्झॅक्शन (व्यवहार) करुन तुम्ही 1,250 रुपयांपर्यंत 10% त्वरित सूट (इन्स्टंट डिस्काऊंट) मिळवू शकता. अमेझॉन प्राईम मेंबर्स एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड्द्वारे अॅडवांटेज नो कॉस्ट ईएमआयचा लाभ घेऊ शकतात. हे स्मार्टफोन खरेदी करताना कंपनीकडून कमीत कमी ईएमआयची सुविधा देण्यात आली आहे. सर्वात कमी 1,333 रुपये प्रति महिना ईएमआयची सुविधा दिली गेली आहे. ग्राहक टॉप ब्रँड्सवर 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयसह (No-Cost EMI) 2000 रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊ शकतात.

Xiaomi च्या स्मार्टफोनवर ऑफर (Offer on Xiaomi’s smartphone)

Fab Phones Fest मध्ये नवीनच लाँच करण्यात आलेल्या Redmi 9 Power आणि Mi 10i हे दोन फोन एक्स्ट्रा बँक ऑफर्ससह उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पॉवरहाउस नोट 9 सिरीज (Powerhouse Note 9 series) 10,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. Redmi Note 9 Pro हा स्मार्टफोन 11,999 रुपये इतक्या कमी किंमतीत खरेदी करता येईल. तसेच Xiaomi चे स्मार्टफोन्स तुम्ही 12 महिन्यांपर्यंतच्या नो-कॉस्ट EMI ऑफरसह खरेदी करु शकता.

Samsung Galaxy M-series वर शानदार डिस्काउंट

सॅमसंग एम सिरीज (Samsung Galaxy M-series) स्मार्टफोनवर एक्स्ट्रा अमेझॉन कूपन ऑफरसह 30% पर्यंतची सूट दिली जात आहे. भारतातला पहिला 7000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन Samsung Galaxy M51 तुम्ही 7,250 रुपयापर्यंतच्या एक्स्ट्रा कूपन ऑफरसह खरेदी करु शकता. तर Samsung M31s स्मार्टफोन तुम्ही 4,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काऊंटसह खरेदी करु शकता.

आयफोनवरही आकर्षक ऑफर (Attractive offers on iPhone)

तुम्ही जर आयफोनवेडे असाल तर स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. तुम्ही बँक ऑफरसह आयफोन 12 मिनी खरेदी करू शकता. ऑफरमध्ये हा फोन तुम्ही 58,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. सोबतच ओप्पो आणि व्हिव्हो स्मार्टफोनवरही तुम्हाला उत्तम ऑफर मिळू शकतात.

हेही वाचा

64MP Quad Camera, 7000mAh बॅटरी, इन्स्टंट डिस्काऊंटसह Samsung Galaxy F62 चा पहिला सेल

4GB/64GB, ट्रिपल कॅमेरासह दमदार फीचर्स, Nokia चा बजेट फोन बाजारात

5000mAh बॅटरी, 6.5 इंच डिस्प्ले, किंमत अवघी 7499, Moto चा दमदार स्मार्टफोन लाँच

(Fab Phones Fest on Amazon discount up to 40 percent on samsung galaxy m series, oneplus, iphone until 25th february)