64MP Quad Camera, 7000mAh बॅटरी, इन्स्टंट डिस्काऊंटसह Samsung Galaxy F62 चा पहिला सेल

Samsung Galaxy F62 या स्मार्टफोनचा आज पहिला सेल आयोजित करण्यात आला असून कंपनीने या फोनवर डिस्काऊंट ऑफर देऊ केली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:15 AM, 22 Feb 2021
64MP Quad Camera, 7000mAh बॅटरी, इन्स्टंट डिस्काऊंटसह Samsung Galaxy F62 चा पहिला सेल

मुंबई : दक्षिण कोरियाई स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने गेल्या आठवड्यात त्यांच्या F सिरीजमधील नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy F62 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने Exynos 9825 प्रोसेसर आणि 7000mAh क्षमतेच्या बॅटरीसह सादर केला आहे. सोबतच 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 23999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. दरम्यान, आज या स्मार्टफोनचा पहिला सेल आयोजित करण्यात आला असून कंपनीने या फोनवर डिस्काऊंट ऑफरही देऊ केली आहे. (Samsung Galaxy F62 First sale today with instant discount on flipkart)

या स्मार्टफोनमध्ये 6GB / 8GB रॅम देण्यात आला असून हा One UI 3.1 वर चालतो. सोबतच फोनच्या बॅक पॅनलवर युनिक पॅटर्न मेटॅलिक ग्रेडेशन फिनिश देण्यात आलं आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, Samsung Galaxy F62 स्मार्टफोनची OnePlus Nord, Realme X3 SuperZoom आणि Realme X7 5G या स्मार्टफोनसोबत मार्केटमध्ये टक्कर होणार आहे.

Galaxy F62 च्या फर्स्ट सेलवर इन्स्टंट डिस्काऊंट

कंपनीने या स्मार्टफोनच्या 6GB RAM + 128GB स्टोरेजवाल्या वेरियंटची किंमत 23,999 रुपये इतकी ठेवली आहे. तर या फोनच्या 8GB RAM + 128GB मॉडलची किंमत 25,999 रुपये इतकी ठेवली आहे. ICICI बँक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे तुम्ही Samsung Galaxy F62 हा स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर या फोनवर तुम्हाला 2,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट मिळेल. जर तुम्ही Flipkart Axis बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करत असाल तर तुम्हाला या फोनवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल. जर तुम्ही Yes बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे ईएमआय ट्रान्झॅक्शन करत असाल तर तुम्हाला 7% इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच हा फोन तुम्ही 4,000 रुपये प्रतिमाह अशा EMI स्कीमसह घरी घेऊन जाऊ शकता. दरम्यान, बँक ऑफ बडोदाच्या मास्टरकार्ड डेबिट कार्डवर 10% डिस्काऊंट देण्यात आला आहे. तसेच या फोनच्या खरेदीवर जास्तीत जास्त 16,500 रुपयांची एक्सचेंज ऑफरदेखील देण्यात आली आहे.

सॅमसंगच्या या फोनमध्ये पंचहोल डिझाईनचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच याच्या रियर पॅनेलवर ग्रेडियंट फिनिश आणि एलईडी फ्लॅश सोबत स्क्वेयर शेप कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. फोनमध्ये तुम्हाला साईड फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 7000mAh क्षमतेची बॅटरी आणि 6.7 इंचाचा sAMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. हा फोन 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी इंटर्नल स्टोरेजसोबत लाँच करण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F62 या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप असेल, तर सेल्फीसाठी यामध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत 23999 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनची विक्री Flipkart आणि Samsung.com या वेबसाईटवर केली जाणार आहे.

Samsung Galaxy F62 स्पेसिफिकेशन्स

परफॉर्मन्स Exynos 9611 (10nm)
डिस्प्ले 6.5 inches (16.51 cm)
स्टोरेज 128 GB
कॅमरा 64 MP + 12 MP + 5 MP + 5 MP
बॅटरी 4500 mAh
किंमत 23999, 25999
रॅम 6 GB, 8 GB

 

फास्ट परफॉर्मिंग स्मार्टफोन

Samsung फ्लॅगशिप 7nm Exynos 9825 प्रोसेसर हा दमदार असल्याचे याआधीही अनेकदा स्पष्ट झाले आहे. हा प्रोसेसर अधिक वेगवान, सक्षम आणि फास्ट परफॉर्मिंग आहे. 7nm EUV टेक्नोलॉजी हा फक्त चांगला परफॉर्मन्सचं देत नाही, तर प्रोसेसरची क्षमताही वाढवतो. Exynos 9825 प्रोसेसर हा इतर सर्व प्रोसेसरच्या तुलनेत 32 टक्के जास्त क्षमतेने काम करतो. हा प्रोसेसर चांगला व्हिडीओ Viewing experience देतो. त्यामुळे Samsung Galaxy F62 हा फोन ऑल राऊंडर #FullOnSpeedy स्मार्टफोन ठरण्याची शक्यता आहे. तसेच या फोनला 7nm EUV टेक्नोलॉजीमुळे या स्मार्टफोनला दमदार बॅटरी बॅकअप देण्यात आलं आहे. त्यामुळे फोनचा जास्त वापर करणाऱ्यांसाठी हा फोन उत्तम पर्याय ठरु शकतो.

हेही वाचा

‘रिअल मी’चा 5 जी स्मार्टफोन लवकरच बाजारात, ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत अत्याधुनिक सुविधा मिळणार

भारतात लवकरच लाँच होणार सॅमसंगचा नवा फोन, कमी किंमतीत मिळणार हे शानदार फिचर्स

अ‍ॅपल वॉचला टक्कर देणार फेसबुकचे स्मार्टवॉच, पुढील वर्षी स्मार्टवॉच बाजारात आणण्याची फेसबुकची योजना

(Samsung Galaxy F62 First sale today with instant discount on flipkart)