भारतात लवकरच लाँच होणार सॅमसंगचा नवा फोन, कमी किंमतीत मिळणार हे शानदार फिचर्स

भारतात लवकरच लाँच होणार सॅमसंगचा नवा फोन, कमी किंमतीत मिळणार हे शानदार फिचर्स (Samsung's new smartphone will be launched in India soon)

  • Updated On - 4:36 pm, Sat, 13 February 21
भारतात लवकरच लाँच होणार सॅमसंगचा नवा फोन, कमी किंमतीत मिळणार हे शानदार फिचर्स
लवकरच लाँच होणार सॅमसंगचा नवा फोन

मुंबई : मोबाईल कंपनीमध्ये अग्रेसर असलेली कंपनी सॅमसंग आता ग्राहकांसाठी नवा स्मार्टफोन बाजारात आणत आहे. सॅमसंग गॅलक्सी एस21 सीरीजमध्ये नवा स्मार्टफोन गॅलक्सी एस 21 एफई मॉडेल बाजारात लाँच करीत आहे. सॅमसंगचा नवा स्मार्टफोन मॉडेल क्रमांक SM-G990B असा असून हा गॅलक्सी एस20 ई प्रमाणे आहे. सॅमसंग कथित स्वरुपात गॅलक्सी एस 21 सीरीजच्या 4 जी व्हेरिएन्टवर काम करीत आहे. मॉडेल क्रमांक SM-G990F आणि SM-G990F_DS असलेले दोन स्मार्टफोन ब्लूटूथ एसआयजी वेबसाईटवर निदर्शनास आले. 4 जी व्हेरिएंट आणि एफई मॉडेल्सच्या लॉन्चमुळे गॅलेक्सी एस 21 ला केवळ 5 जी चे परवडणारे व्हेरिएंट म्हणून लाँच करेल अशी शक्यता दिसते. (Samsung’s new smartphone will be launched in India soon)

5 जी सपोर्टेड असेल फोन

गॅलक्सी एस21 एफई 5 जी सपोर्टेड असून फोन स्टोरेजसाठी 128 जीबी आणि 256 जीबी चे दोन व्हेरिएन्ट देण्यात आले आहे. स्मार्टफोन अँड्रॉईड 11 च्या आउट-ऑफ-द-बॉक्स के सह लॉन्च करण्यात येईल. हा स्मार्टफोन ग्रे / सिल्व्हर, गुलाबी, वांगी आणि सफेद या चार कलर ऑप्शन्स में लॉन्च करण्याची शक्यता आहे. गॅलक्सी एस 21 एफई फ्लॅगशिप गॅलक्सी एस 21 सीरीजचे परवडणारे व्हेरिएन्ट असेल.

गॅलक्सी एस 21 मधील वैशिष्टे

गॅलेक्सी एस 21 मध्ये 6.2 इंचाचे फुल-एचडी + इन्फिनिटी-ओ डिस्प्ले दिले असून याची पिक्सेल डेंसिटी 421ppi आहे. पॅनल फ्रंट कॅमेरासाठी एक पंच-होलचे काम करते. गॅलक्सी एस 21 प्लस आकाराने थोडा मोठा असून यात 6.7 इंच डिस्प्ले पॅनेलसह येते. हे 394ppi हून कमी पिक्सल डेंसिटीवर काम करते. गॅलेक्सी एस21 अल्ट्रा या दोन्ही हँडसेटच्या तुलनेत मोठा असून हा 515ppi पिक्सेल डेंसिटीसह 6.8 इंच के इन्फिनिटी-ओ डिस्प्लेसह येते. गॅलेक्सी एस 21 अल्ट्रा का डिस्प्ले गॅलेक्सी नोट सीरीज के एस पेनलाही सपोर्ट करते. गॅलेक्सी S21 आणि S21 + मध्ये ट्रिपल रियर कॅमरा सेटअप आहे. यात प्रायमरी कॅमेरा 64-मेगापिक्सल, सेकेंडरी कॅमरा 12-मेगापिक्सल आणि वाईड-एंगल लेन्स 12-मेगापिक्सलचे आहे. यात 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमरा दिला आहे.

याआधी गॅलक्सी एस 20 केला होता लाँच

सॅमसंग गॅलक्सीने एस 20 एफई फोन भारतात 49,999 रुपये किंमतीत लाँच केले होते. यात 120 हर्ट्रझ रिफ्रेश रेटसह 6.5 इंचची फुल एचडी प्लस सुपर अमोल्ड डिस्प्ले आहे. स्मार्टफोन Exynos 990 चिपसेट द्वारा संचालित असून यात 8जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज देण्यात आलेय. स्मार्टफोनमध्ये 12 मेगा पिक्सलचे प्रायमरी सेंसर, 12 मेगा पिक्सलचे सेकंडरी सेंसर आणि 8 मेगा पिक्सलचे टेलीफोटो लेन्स आहे. यात सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. सॅमसंग गॅलक्सी एस20 एफईमध्ये 500mAh ची बॅटरी, 15W फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगसाठी देण्यात आली आहे. (Samsung’s new smartphone will be launched in India soon)

 

 

इतर बातम्या

अ‍ॅपल वॉचला टक्कर देणार फेसबुकचे स्मार्टवॉच, पुढील वर्षी स्मार्टवॉच बाजारात आणण्याची फेसबुकची योजना

Maruti Suzuki च्या उत्पादनात घट, प्रवासी वाहनांच्या सेगमेंटमध्ये मोठं नुकसान

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI