64MP Quad Camera, 7000mAh बॅटरी, अवघ्या काही तासांत सॅमसंगचा दमदार स्मार्टफोन युजर्सच्या भेटीला

भारतीय ग्राहकांना Samsung Galaxy F62 या फोनसाठी आता फार वेळ वाट पाहावी लागणार नाही.

64MP Quad Camera, 7000mAh बॅटरी, अवघ्या काही तासांत सॅमसंगचा दमदार स्मार्टफोन युजर्सच्या भेटीला

मुंबई : भारतीय ग्राहकांना Samsung Galaxy F62 या फोनसाठी आता फार वेळ वाट पाहावी लागणार नाही. कंपनी त्यांच्या लोकप्रिय गॅलेक्सी F सिरीजमधील हा नवीन स्मार्टफोन उद्या (15 फेब्रुवारी) लाँच करणार आहे. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर सॅमसंगच्या या अपकमिंग फोनसाठीचं लँडिंग पेजही अपडेट करण्यात आलं आहे. या फोनच्या लाँचिंग डेटसह नुकताच या फोनच्या रियर आणि फ्रंट पॅनलच्या डिझाईनवरील पडदा हटवण्यात आला आहे. (Samsung Galaxy F62 is going to launch tomorrow, check features and price of this smartphone)

सॅमसंगच्या या फोनमध्ये पंचहोल डिझाईनचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच याच्या रियर पॅनेलवर ग्रेडियंट फिनिश आणि एलईडी फ्लॅश सोबत स्क्वेयर शेप कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. फोनमध्ये तुम्हाला साईड फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 7000mAh क्षमतेची बॅटरी आणि 6.7 इंचाचा sAMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. हा फोन 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी इंटर्नल स्टोरेजसोबत लाँच केला जाणार आहे.

किंमत किती?

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F62 या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप असेल, तर सेल्फीसाठी यामध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या फोनची किंमत 25 हजार रुपयांपेक्षा कमी असेल, असा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. हा स्मार्टफोनची विक्री Flipkart आणि Samsung.com या वेबसाईटवर केली जाणार आहे.

जबरदस्त प्रोसेसर

हा फोन Galaxy F41 या फोनचे अपग्रेडेड वर्जन आहे. Samsung Galaxy F62 या स्मार्टफोन #FullOnSpeedy हा फ्लॅगशिप 7nm Exynos 9825 प्रोसेसरसोबत लाँच केला जाणार आहे. जो स्नॅपड्रॅगन 765 जी पेक्षा अधिक दमदार असेल. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात गीकबेंच लिस्टिंगवर हा फोन Exynos 9825 चिपसेट सोबत पाहायला मिळाला होता.

Samsung Galaxy F62 स्पेसिफिकेशन्स

परफॉर्मन्स Exynos 9611 (10nm)
डिस्प्ले 6.5 inches (16.51 cm)
स्टोरेज 128 GB
कॅमरा 64 MP + 12 MP + 5 MP + 5 MP
बॅटरी 4500 mAh
किंमत 22155 to 25000
रॅम 6 GB, 8 GB

फास्ट परफॉर्मिंग स्मार्टफोन

Samsung फ्लॅगशिप 7nm Exynos 9825 प्रोसेसर हा दमदार असल्याचे याआधीही अनेकदा स्पष्ट झाले आहे. हा प्रोसेसर अधिक वेगवान, सक्षम आणि फास्ट परफॉर्मिंग आहे. 7nm EUV टेक्नोलॉजी हा फक्त चांगला परफॉर्मन्सचं देत नाही, तर प्रोसेसरची क्षमताही वाढवतो. Exynos 9825 प्रोसेसर हा इतर सर्व प्रोसेसरच्या तुलनेत 32 टक्के जास्त क्षमतेने काम करतो. हा प्रोसेसर चांगला व्हिडीओ Viewing experience देतो. त्यामुळे Samsung Galaxy F62 हा फोन ऑल राऊंडर #FullOnSpeedy स्मार्टफोन ठरण्याची शक्यता आहे. तसेच या फोनला 7nm EUV टेक्नोलॉजीमुळे या स्मार्टफोनला दमदार बॅटरी बॅकअप देण्यात आलं आहे. त्यामुळे फोनचा जास्त वापर करणाऱ्यांसाठी हा फोन उत्तम पर्याय ठरु शकतो.

हेही वाचा

‘रिअल मी’चा 5 जी स्मार्टफोन लवकरच बाजारात, ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत अत्याधुनिक सुविधा मिळणार

बॅन केलेलं TikTok पुन्हा येणार; ‘ही’ भारतीय कंपनी अ‍ॅप खरेदीसाठी इच्छूक

भारतात लवकरच लाँच होणार सॅमसंगचा नवा फोन, कमी किंमतीत मिळणार हे शानदार फिचर्स

अ‍ॅपल वॉचला टक्कर देणार फेसबुकचे स्मार्टवॉच, पुढील वर्षी स्मार्टवॉच बाजारात आणण्याची फेसबुकची योजना

(Samsung Galaxy F62 is going to launch tomorrow, know features and price of this smartphone)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI