‘रिअल मी’चा 5 जी स्मार्टफोन लवकरच बाजारात, ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत अत्याधुनिक सुविधा मिळणार

'रिअल मी'चा 5 जी स्मार्टफोन लवकरच बाजारात, ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत अत्याधुनिक सुविधा मिळणार (Real Me's 5G smartphone will be launched soon)

'रिअल मी'चा 5 जी स्मार्टफोन लवकरच बाजारात, ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत अत्याधुनिक सुविधा मिळणार
आता 'रिअल मी'च्या स्मार्टफोनमध्ये मिळणार 5 जी टेक्नोलॉजी
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 11:47 AM

मुंबई : दिवसेंदिवस टेक्नोलॉजीमध्ये मोठे बदल होत आहेत. ग्राहकांना अधिक टेक्निकल सुविधा पुरवण्याचा प्रत्येक मोबाईल कंपनी प्रयत्न करीत आहे. चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी रियल मी भारतीय 5 जी फोन मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. रिअल मी ने शनिवारी जाहिर केले की, कंपनी भारतात अपकमिंग टेक्नोलॉजी घेऊन येण्यास सज्ज झाली आहे आणि याचा युजर्सला मोठा फायदा होणार आहे. भारतात लाँच होणारे अर्ध्याहून अधिक फोन हे 5जी असतील, असे रिअल मी चे सीईओ माधव सेठ यांनी सांगितले. माधव सेठ यांनी मुलाखती दरम्यान ही माहिती दिला आहे. (Real Me’s 5G smartphone will be launched soon)

काय म्हणाले माधव सेठ?

माधव सेठ यांनी पुढे सांगितले की, 20,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे स्मार्टफोन 5 जी टेक्नोलॉजीचे असतील. आम्ही आमच्या स्मार्टफोनमध्ये हे नवीनतम तंत्रज्ञान देण्यास प्रारंभ करू. आमच्या वापरकर्त्यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अनुभव घ्यावा आणि यासाठी त्यांना यापुढे अधिक किंमत मोजावी लागू नये, अशी आमची इच्छा आहे.

रिअल मी चा 5 जी प्लान

5 जी सध्या संपूर्ण जगात ट्रेंड करीत आहे, तर रिअल मी भारत, युरोप आणि इतर जागतिक बाजारपेठांमध्ये 5 जी अधिक प्रसिद्ध करीत आहे. माधव सेठ यांनी सांगितले की, आम्ही आमच्या युजर्सला पॉवर मॅनेजमेंट, डिस्प्ले ऑप्टिमायझेशन, कॅमेरा सपोर्ट, गेमिंग परफॉर्मन्स आणि कंज्युमर फ्युचर रेडी 5 जी देऊ इच्छिते. भारतातील स्मार्टफोन बाजारात 10 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे, तर 5 जी शिपमेंट्समध्ये या वर्षात 30 दशलक्ष युनिटपर्यंत वाढ दिसून येईल. रिअल मी X7 5G भारतातील पहिला 7nm मीडियाटेक डायमेंसिटी 800U 5G चिपसेट असून यात 5जी ड्युअल सिम देण्यात आले आहे.

89 टक्के स्मार्टफोनची किंमत 20 हजाराहून कमी

गेल्या वर्षी 2020 च्या तिमाहीपर्यंत भारतात 5 जी शिपमेंटचा आकडा 1.7 मिलियनपर्यंत होता, तो वर्षाअंती 4 मिलियनहून अधिक होता. कंपनीची इच्छा आहे की, नवीन 5 जी फोनची किंमत 20 हजारांच्या रेंजमध्ये असावी. कारण भारतात गेल्या वर्षी 2020 मध्ये जे 89 टक्के स्मार्टफोन्स शिप केले गेले त्याची किंमत 20 हजारांहून कमी होती. (Real Me’s 5G smartphone will be launched soon)

इतर बातम्या

Petrol Diesel Price: आठवड्याच्या शेवटीही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, इथे वाचा ताजे दर

India vs England 2nd Test, 2nd Day Live | पहिल्या सत्रावर टीम इंडियाचं वर्चस्व, इंग्लंडच्या 4 बाद 39 धावा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.