AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price: आठवड्याच्या शेवटीही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, इथे वाचा ताजे दर

पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या किंमतींमध्ये (Diesel Price) दिलासा मिळण्याची कोणतीही बातमी समोर येत नाहीये.

Petrol Diesel Price: आठवड्याच्या शेवटीही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, इथे वाचा ताजे दर
| Edited By: | Updated on: Feb 14, 2021 | 8:15 AM
Share

मुंबई : वाढत्या महागाईमुळे पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या किंमतींमध्ये (Diesel Price) दिलासा मिळण्याची कोणतीही बातमी समोर येत नाहीये. पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढताना दिसत आहेत. खरंतर, पेट्रोल कंपन्यांद्वारे दररोज नवीन पेट्रोल डिझेल दर जारी केले जातात. त्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली असून आज सलग सातव्या दिवशी हे दर वाढले आहेत. (petrol diesel price today hike on sunday here know the new rate of mumbai delhi and kolkata)

आज दिल्लीत डिझेलच्या किंमतीत 29 पैशांची वाढ झाली आहे, तर इतर शहरांमध्येही किंमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आत्तापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, रविवारी म्हणजेच आज दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर 88.73 रुपये आहे, तर मुंबईत 95.21 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल दर प्रतिलिटर 90.01 रुपये तर चेन्नईमध्ये ते प्रति लिटर 90.96 रुपये आहे.

इतकंच नाहीतर आज दिल्लीत डिझेल 79 .0.०6 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर 86.04 आहे, कोलकातामध्ये प्रतिलिटर 82.65 रुपये, चेन्नईमध्ये डिझेलचा दर प्रतिलिटर .1 84.१6 रुपये आहे.

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर

दिल्ली (Delhi Petrol Price Today): 88.73 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today): 95.21 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today):90.01 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today): 90.96 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Petrol Price Today): 87.50 रुपये प्रतिलिटर

प्रमुख शहरांमध्ये डिझेलचे दर

दिल्ली (Delhi Diesel Price Today): 79.03 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today): 86.06 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 82.65 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today): 84.16 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Diesel Price Today): 79.49 रुपये प्रतिलिटर

नाशिक –

पेट्रोल – 95 रुपये 56 पैसे डिझेल – 85 रुपये 7 पैसे

आज वाढले – पेट्रोल – 28 पैसेनी वाढले डिझेल – 33 पैसेनी वाढले

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (petrol diesel price today hike on sunday here know the new rate of mumbai delhi and kolkata)

संबंधित बातम्या –

Petrol Latest Price | पेट्रोल 95 रुपयांवर, केंद्र आणि राज्य सरकारला किती फायदा?

फेक विमा कंपनीचा आयआरडीएआयकडून पर्दाफाश, कंपनीकडून पॉलिसी खरेदी न करण्याचे आवाहन

7th Pay Commission: 1 एप्रिलपासून तुमचा पगार, पीएफ, ग्रॅच्युइटीमध्ये मोठा बदल; समजून घ्या…

या मोबाईल अ‍ॅपद्वारे Post Office मध्ये उघडा खातं, घर बसल्या होईल काम

(petrol diesel price today hike on sunday here know the new rate of mumbai delhi and kolkata)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.