Petrol Latest Price | पेट्रोल 95 रुपयांवर, केंद्र आणि राज्य सरकारला किती फायदा?

पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या (Diesel Price) वाढत्या किंमतींमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे.

Petrol Latest Price | पेट्रोल 95 रुपयांवर, केंद्र आणि राज्य सरकारला किती फायदा?
पेट्रोल आणि डिझेल
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 8:29 PM

मुंबई : पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या (Diesel Price) वाढत्या किंमतींमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होत आहे. शुक्रवारनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा थोडेफार बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरंतर, दररोज पेट्रोल कंपन्यांद्वारे नवीन पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी केले जातात. त्यांच्या मते, शनिवारी म्हणजेच आठवड्याच्या सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या. आज पेट्रोल 30 आणि डिझेल 36 पैसे प्रति लीटरने महाग झालं आहे. (Petrol Latest Price petrol touched 95 rupees in mumbai, know how much tax govt get)

पेट्रोलच्या किंमती वाढल्याने आज मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लीटर 95 रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. दिल्लीत दिल्लीत पेट्रोल 88.41 रुपये/लीटर आणि डिझेल 78.74 रु./लीटर झालं आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 94.93 रुपले प्रति लीटर आणि डिझेलची किंमत 85.70 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचली आहे. विवध राज्यातील पेट्रोलियम उत्पादनांवरील व्हॅट आणि इतर शुल्काच्या वेगवेगळ्या दरांमुळे इंधनाचे दर वेगवेगळे असतात.

केंद्र आणि राज्य सरकारला किती पैसे मिळतात?

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरुन मिळालेल्या माहितीनुसार 1 फेब्रुवारीला दिल्लीत पेट्रोलची किंमत 86.30 रुपये प्रति लीटर होती. तेव्हा त्याची मूळ किंमत 29.34 रुपये, त्यावरील भाडं 0.37 रुपये होतं. त्यामुळे डीलर्सना पेट्रोल 29.71 रुपये प्रति लीटर इतक्या किंमतीत मिळत होतं. त्यावर एक्साइज ड्युटी 32.98 रुपये, डीलर कमिशन 3.69 रुपये आणि वॅट 19.92 रुपये होतं. त्यामुळे सर्व मिळून पेट्रोलची किंमत 86 रुपयांच्या पुढे जाते. 1 फेब्रुवारी रोजी दिल्लीत डिझेलची किंमत 76.48 रुपये होती. डिझेलची बेसिक प्राईस 30.55 रुपये, त्यावरील भाडं 0.34 रुपये, एक्साईज ड्युटी 31.83 रुपये, डीलर कमिशन 2.54 रुपये आणि वॅट 11.22 रुपये आकारला जातो. त्यामुळे डिझेलची किंमत 76 रुपयांपर्यंत पोहोचते. एक्साइज ड्युटी ही केंद्र सरकारला मिळते तर विविध राज्यांमध्ये VAT वेगवेगळा असतो. VAT राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होतो.

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर

  • मुंबई (Mumbai Petrol Price Today): 94.64 रुपये प्रतिलिटर
  • नाशिक (Nashik Petrol Price Today): 94.93 रुपये प्रतिलिटर
  • पुणे (Pune Petrol Price Today ): 94.98 रुपये प्रतिलिटर
  • नागपूर (Nagpur Petrol Price Today): 94 .51 रुपये प्रतिलिटर
  • दिल्ली (Delhi Petrol Price Today): 88.14 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता (Kolkata Petrol Price Today): लिटर 89.44 रुपये
  • चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 90.44 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमध्ये डिझेलचे दर

  • मुंबई (Mumbai Diesel Price Today): 85.32 रुपये प्रतिलिटर
  • नाशिक (Nashik Diesel Price Today): 84.30 रुपये प्रतिलिटर
  • पुणे (Pune Diesel Price Today): 84.15 रुपये प्रतिलिटर
  • नागपूर (Nagpur Diesel Price Today): 83.93 रुपये प्रतिलिटर
  • दिल्ली (Delhi Diesel Price Today): 78.38 रुपये प्रतिलिटर
  • कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 81.96 रुपये प्रतिलिटर
  • चेन्नई (Chennai Diesel Price Today) 83.5 रुपये प्रतिलिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price latest rate of fuel in your city delhi mumbai pune nashik chennai)

संबंधित बातम्या – 

मनात आणलं तर या व्यवसायात लाखापर्यंत कमवाल, खूप फायद्याची आहे बिझनेस आयडिया

कमी पैशात सोप्या पद्धतीने सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दिवसाला कमवाल 4000 रुपये

Petrol Price : राज्यात आज पेट्रोल स्वस्त की महाग? वाचा तुमच्या शहरातले दर

(Petrol Latest Price petrol touched 95 rupees in mumbai, know how much tax govt get)

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.