AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकाला छिद्रं, जनता आता कंटाळलीय; चंद्रकांत पाटील यांची सडकून टीका

महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. | Chandrakant Patil

तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकाला छिद्रं, जनता आता कंटाळलीय; चंद्रकांत पाटील यांची सडकून टीका
चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे
| Updated on: Feb 14, 2021 | 11:28 AM
Share

मुंबई : महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत. अनेक मंत्र्यांच्या कारनामे, भानगडी व मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस आलीय, अशी घणाघाती टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. (Chandrakant Patil Slam Uddhav thackeray Government)

चंद्रकात पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत महाविकास आघाडी ससरकारवर तसंच सरकारमधील मंत्र्यांवर जोरदादर आसूड ओढलेत. सरकारमधील चार मंत्र्यांवर निशाणे साधत सरकार काही कामाचं नाही. सरकारमधील मंत्री कोणत्या ना कोणत्या तरी घोटाळ्यात व कारनाम्यात फसले आहेत, अशी टीका त्यांनी केलीय.

विकासाची जबाबदारी असणारे मंत्री घोटाळ्यात आणि कारनाम्यात फसलेत

चंद्रकांत पाटील म्हणाले, “महाराष्ट्रात विकास होईल अशी वेडी आशा भोळी बाभडी जनता करत आहे, परंतु विकास करण्याची जबाबदारी ज्या मंत्र्यांकडे आहे ते मंत्री कोणत्या ना कोणत्या तरी घोटाळ्यात व कारनाम्यात फसले आहेत. पुण्यात पूजा चव्हाणच्या आत्महत्येत ठाकरे सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याचे नाव सध्या झळकत आहे. मंत्र्यांचे तरुणीसोबत अनैतिक प्रेम संबंध होते आणि त्यांनी विश्वासघात केल्यामुळे तरुणीने आत्महत्या केली अशी माहिती प्रसिध्दी माध्यमांवर येत आहे.”

चंद्रकांत पाटील यांचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा

“काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकार मधील एका कॅबिनेट मंत्र्यांच्या विरोधात त्यांच्याच एका कथित प्रेयसीने बलात्काराचे आरोप केले आणि त्यांनीच स्वतः आपले अनैतिक संबंध आणि मुलं असल्याच्या भानगडीची कुबली दिली. संपूर्ण राज्यात या मुद्द्यावर निदर्शने झाली तरीही त्या भानगडीबाज मंत्र्यांनी अद्यापही राजीनामा दिला नाही”, असं ते म्हणाले.

चंद्रकांत दादांची नवाब मलिक, जितेंद्र आव्हाडांवर टीका

“काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकार मधील कॅबिनेट मंत्र्यांच्या जावयाला ED ने ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. तर एका कॅबिनेट मंत्र्यांनी थेट पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. आणखी एक मुजोर कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्या विरोधातील एक फेसबुक पोस्ट सहन न झाल्यामुळे एका इंजिनिअर युवकाला बेदम मारहाण केली होती आणि स्वतः ते मंत्री मारहणीच्यावेळी उपस्थित होते”, असंही त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केलंय.

“ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री यांच्या मतदारसंघात सतत हिंदू कुटुंबांना पळवून लावले जात आहे आणि हिंदूंचा सर्वेसर्वा म्हणवणारी म्हणवणा-या शिवसेनेने सत्तेसाठी तोंडावर लाचारीची पट्टी लावली आहे. ठाकरे सरकार प्रत्येक टप्प्यात अपयशी झाले आहे”, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

जनतेने शिवसेना-भाजप युतीला कौल दिला

जनतेने भाजपा आणि शिवसेनेच्या युतीला कौल दिला होता, अशी आठवण व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने सांगत छुप्या दरवाजाने घुसलेल्या शिवसेना– राष्ट्रवादी कॉंग्रेस– कॉंग्रेसने अनैसर्गिक सरकार बनवून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

(Chandrakant Patil Slam Uddhav thackeray Government)

हे ही वाचा :

शरद पवारांच्या त्या गंभीर आरोपांना रामदास आठवले यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, चौकशी झालीच पाहिजे!

काँग्रेसच्या त्रिकूटाची धास्ती, विदर्भात भाजपचे मिशन ओबीसी, बावनकुळे मैदानात

सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.