शरद पवारांच्या त्या गंभीर आरोपांना रामदास आठवले यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, चौकशी झालीच पाहिजे!

शरद पवारांच्या त्या गंभीर आरोपांना रामदास आठवले यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, चौकशी झालीच पाहिजे!
रामदास आठवले आणि शरद पवार

प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यालरील हल्ला भाजपने घडवून आणला यात तथ्य नाही, असं प्रत्युत्तर रामदास आठवले यांनी शरद पवार यांना दिलं आहे. | Ramdas Athawale

Akshay Adhav

|

Feb 14, 2021 | 10:07 AM

अहमदनगर : प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात बोलताना केला. त्यांच्या या आरोपाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलंय. शरद पवारांच्या म्हणण्यात कसलंही तथ्य नाही, असं ते म्हणालेत. (Ramdas Athawale reply Sharad pawar over red Fort Violence)

शरद पवारांच्या म्हणण्यात तथ्य नाही

26 जानेवारीला दिल्लीतील हल्ला भाजपने घडवून आणला यात तथ्य नाही. प्रजासत्ताक दिनी पोलिसांनी आंदोलनाला परवानगी द्यायला नको होती मात्र दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली. त्यामध्ये शेतकरी आंदोलनामध्ये कुणी आतंकवाद्यांनी शिरुन हल्ला केला. शरद पवार जुने जाणते आहेत. या प्रकणाची चौकशी व्हावी म्हणजे सत्य बाहेर येईल, असं ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी लग्न करावं आणि मग बोलावं, ‘हम दो हमारे दो…’

‘हे सरकार म्हणजे हम दो हमारे दो आहे’, अशी बोचरी टीका काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आठवले यांनी उत्तर दिलं. राहुल गांधींनी लग्न करायला पाहिजे त्याशिवाय त्यांचं हम दो हमारे दो होणार नाही, असा टोलाही आठवले यांनी लगावला. तसंच राहुल गांधी यांनी मोदींवर केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही कारण अंदानी आणि अंबानी यांना मोठं करण्याची गरज नाही ते आधीपासूनच आर्थिक दृष्ट्या मोठे आहेत, असा टोलाही त्यांनी राहुल गांधींना लगावला.

पूजा चव्हाण प्रकरणाची पुणे पोलिसांनी कसून तपास करावा

मूळची परळीची असलेली पुणे स्थित तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येने राज्यात खळबळ माजली आहे. राज्य सरकारमधील एका बड्या मंत्र्याच्या भोवती संशयाची सुई आहे, असा आरोप भाजपने केला आहे. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, “पुण्यातील पूजा चव्हाण प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाची शहानिशा झाली पाहिजे. पुणे पोलिसांनी चौकशी करावी”

राज्यपालांना सरकारी विमान नाकारणं हा तर राज्याचा अपमान

हा राज्यपालांचा अपमान नाही तर राज्याचा अपमान आहे. ते यूपीएससी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमासाठी देहरादूनला जात होते. त्यांना विमानातून खाली उतरवणं हा राज्याचा अपमान आहे. राज्याची राजनीती नीतीवर आधारलेली आहे. बारा आमदार नियुक्ती बाबत मुंबई हाय कोर्टामध्ये रिट पिटीशन दाखल आहे त्याचा निकाल लागल्यानंतर आमदार नियुक्त होतील, असंही त्यांनी सांगितलं.

शरद पवार नेमकं काय म्हणाले होते ज्यावर आठवलेंनी प्रत्युत्तर दिलंय…?

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घातला गेला याबद्दल आम्ही जरा खोलात जाऊन माहिती घेतली. त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारी लोकं शेतकरी नव्हते तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असं मोठं आणि तितकंच गंभीर वक्तव्य शरद पवार यांनी केलं.

हे ही वाचा :

मंत्र्याला हाकला, घरी पाठवा; चौकशी होत राहील; पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी निलेश राणे आक्रमक

Video | कोल्हापुरात 50 शेतकऱ्यांचा 60 एकरातील ऊस जळून खाक, लाखोंचं नुकसान

Valentine Day : केवळ एकच दिवस नाही तर प्रत्येक दिवस प्रेमाचा व्हावा म्हणून….!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें