AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Valentine Day : केवळ एकच दिवस नाही तर प्रत्येक दिवस प्रेमाचा व्हावा म्हणून….!

प्रेम या संकल्पनेकडे बघण्याचा साचेबद्ध आणि संकुचित दृष्टिकोन आपल्याकडे आहे तो बदलत्या जमान्यात बदलायला हवा...

Valentine Day : केवळ एकच दिवस नाही तर प्रत्येक दिवस प्रेमाचा व्हावा म्हणून....!
व्हॅलेन्टाईन साजरा करताना.....
| Updated on: Feb 14, 2021 | 9:35 AM
Share

Valentine Day : मोबाइल उघडला आणि उबरचा मेसेज आलेला दिसला book your ride to meet your valentine… इतक्या दिवसात नियमित रुटीन सुरु झाल्यामुळे कोरोनाचा विषय मागे पडलेला तो… या मेसेजमुळे डोक्यात आला… कोरोनामुळे अनेक कपल्सना एकमेकांना भेटणं अवघड झालं होतं… यात अनेकांना कायमचं दूर व्हावं लागलं. व्हिडीओ कॉल, चॅटिंग हे पर्याय आहेतच संपर्कासाठी पण प्रत्यक्ष भेटण्याची उर्मी कशाने भरुन काढता येत नाही… त्यात प्रेमाला आपल्या समाजात विरोध असल्यामुळं अनेकदा घरच्यांपासून लपवूनच अनेक जोडप्यांना प्रेम करावे लागते या गोष्टी कोरोना लॉकडाऊनने अजून अवघड करून ठेवल्या. व्हॅलेंटाईन डे निमित्त उबर अ‌ॅप सारख्या अनेक जाहिराती, मेसेज इतर कंपन्यांच्या सुद्धा आल्या. अरे प्रेमाचा दिवस आला की, याची जाणीव झाली… यावर्षी कोरोनामुळे लोकांचं नुकसान झाल्याने शहरी बाजारात उत्साह कमी दिसत असला तरी मागच्या वर्षापर्यंत दुकाने, बाजार, रस्त्यावरचे विक्रेते यांच्याकडे लाल रंगाचे गुलाब, टेडीपासून अनेक विविध गिफ्ट देण्याच्या वस्तूंनी बाजार फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यात फुललेला दिसायचा… जसा इतर सणाच्या वेळी दिसतो. यावर्षी देखील काही प्रमाणात तो तसा फुललेला दिसतोय आणि तरुणाईची व्ह‌ॅलेंटाईन डे साजरा करण्याची तयारी देखील दिसतीय.

व्हॅलेंटाईन डे चं सेलिब्रेशन :

आजकाल शहरात आणि निमशहरी भागात तरुणाई, मध्यम वयाचे, लग्न झालेले स्त्री-पुरुष, आदी व्हॅलेंटाईन डे साजरा करताना दिसतात. अगदी अलीकडे कॉलेजची मुलं मुली व्हलेंटाईन विक साजरा करतात. रोझ डे, चॉकलेट डे, प्रपोज डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि मग व्हलेंटाईन डे साजरा केला जातो… आपल्या आवडत्या व्यक्तीला गिफ्ट देणं, किंवा फिरायला घेऊन जाणं असा साजरा केला जात आहे.

स्वत:वर प्रेम करणं कधी शिकवलंच जात नाही…

महागडे गिफ्ट आणि बाजाराची चैन सर्वांना परवडणारी नसते. प्रेमाचा पार्टनर नसणं आणि असला तरी आर्थिक बाबीमुळे मार्केटच्या रेट्याप्रमाणे प्रेम साजरं करण जमत नसल्याने अनेक तरुणांमध्ये निराशा तयार होते. शहरात किमान लांबच्या सार्वजनिक ठिकाणी भेटता येतं पण गावात साधं बोलायची भेटायची सोय नाही. लगेच सगळीकडे चर्चा होते आणि घरी कळल की संपलं सगळं… घरी कळू नये म्हणून किती जीवाचा आटापिटा केला जातो. जात, वर्ग, भाषा, प्रांत आणि अश्या अनेक गोष्टींमुळ चाकोरीबद्ध समाज व्यवस्थेमुळे अनेक मुलं मुली एकत्र येऊ शकत नाहीत. व्हॅलेंटाईन डे बद्दल आकर्षण असलं तरी ज्यांना गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड नाही अश्याना न्यूनगंडाने एक निराशाजनक वातावरण आजूबाजूकडून मिळतं. कारण प्रेम करणं किंवा स्वत:वर प्रेम करणं कधी शिकवलंच जात नाही.

प्रेमाकडे व्यापक दृष्टीने पाहायला हवं…

प्रेम या संकल्पनेकडे बघण्याचा साचेबद्ध आणि संकुचित दृष्टिकोन आपल्याकडे आहे… स्त्री-पुरुषांमधील प्रेमापेक्षा आईवडिलांवरचं प्रेम, देशावरचं प्रेम कसं महत्त्वाचं, श्रेष्ठ असे डोस तरुणाईला आजूबाजूच्या सांस्कृतिक वातावरणातून दिले जातात आणि बहुसंख्य तरुणांना हेच श्रेष्ठ वाटत असतं. खरंतर स्त्री-पुरुष आकर्षण, प्रेम, देशप्रेम आई वडिलांवरचं प्रेम हे वेगवेगळं आहे. बॉलिवूडच्या सगळ्या फिल्मच्या थीम्स या प्रेमाभोवती फिरतात पण प्रेमाला रोमॅंटिक कविता, कथा, कांदबरी व्यतिरिक्त कुणी त्यावर सीरियस चर्चा करत नाही, समजून घेत नाही.

प्रेमाचा दिवस जरुर साजरा करावा

प्रेमाचा दिवस साजरा करण्याला काहीच हरकत नाही. तसं ही सगळी पाश्चिमात्य थेरं आहेत. मातृ पितृ दिन साजरा करा किंवा व्हलेंटाईन डे ला जोडप्यांना त्रास देणारे, गुंडगिरी करणारे काही महाभाग गटही आहेतच. आपल्या संस्कृतीत प्रेम हे आई वडिलांनी निवडून दिलेल्या लग्नाच्या जोडीदारावर करणं अपेक्षित आहे. लग्नाआधी प्रेम करून जोडीदार निवडला तर जात, धर्म, पैसा आणि मान पानं यावरून अनेकजण दुरावतात. काहींचे आंतजातीय प्रेमातून, लग्नातून किंवा नुसते मुलगा- मुलगी बोलत असतील तर प्रेम असण्याच्या संशयाने सुद्धा इज्जतीच्या नावाखाली मुला- मुलींचे खून पाडले जातात. आजूबाजूला काही प्रमाणात, काही वर्गामध्ये परिस्थिती बदलताना दिसत आहे. तरुणाईने आंतरजातीय प्रेम व लग्न करणे व घरातल्याकडून ते स्वीकारण्याचं प्रमाण वाढत आहे. आणि तरुण किमान स्वतःच्या जातीत तरी स्वतःचा जोडीदार स्वतः निवडत असल्याचे चित्र दिसत आहे.

प्रत्येक दिवस प्रेमाचा व्हावा म्हणून…

गौतम बुद्ध जगावर प्रेम करण्याबाबत सांगतात ते समजून घेणं खूप सुंदर आहे… मानवाच्या उत्क्रांतीपासून प्रेमाने जगाला शांततेकडे, सहकार्याकडे नेले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लैंगिक क्रियेपुरतं प्रेम मर्यादित होतं. त्याचा अंश अजूनही आपल्यात शिल्लक आहेच. पुढे जाऊन मानव स्थिर झाल्यावर प्रेमाचे आयाम बदलले आहेत. सांस्कृतिक स्थित्यंतराच्या विविध टप्प्यावर प्रेमाच्या व्याख्या संकल्पना बदलेल्या दिसतात. मानव वंश पुढे चालत राहावं म्हणून मूल जन्माला घातलं जात. यासाठी वयात आल्यांनातर हार्मोन्समुळे भिन्नलिंगी किंवा समलिंगी आकर्षण वाटायला लागत. आणि आवडणार्‍या व्यक्तीबद्दल ओढ वाटयला लागते आणि यालाच प्रेम समजलं जातं.

नातं टिकवण्यासाठी प्रेम गरजेचं

प्रेमात पडल्यावर लोकं वेडीपिसे होतात… आंधळी होतात… त्यांना प्रेमाच्या व्यक्तीमधला दोष दिसत नाही वगैरे म्हटलं जातं. किंवा प्रेमात पडणं सोप्पं आहे पण प्रेम निभावणं अवघड आहे, असं म्हटल जातं. यात सामाजिक कारणांव्यतिरिक्त एक महत्त्वाचं कारण म्हणजे प्रेमाच्या नात्यात गेल्यानंतर प्रेम कसं निभवायचं हे माहिती नसणं… प्रेमात पडल्यानंतर आकर्षण, उत्सुकता कमी कमी होत जाते त्यावेळी प्रेम कायम राहण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात हे समजत नाही. किंवा त्यात स्त्री पुरुषांच्या सामाजिक रोलमुळे अनेक घोळ, गुंतागुंत होत असतात. प्रेमात लग्न हेच ध्येय असतं.. मग संसारात प्रेम हरवून जातं. अश्या वेळी कायम प्रेमात राहण्यासाठी भौतिक सुविधा आणि शरीराची सुंदरता जपणं एवढ्या मर्यादित पद्धतीने प्रेम जपलं जात नाही. त्यासाठी अजून काही प्रयत्न करावे लागतात.

दुसऱ्यावर प्रेम करताना आधी स्वत:वर भरभरुन प्रेम करता यायला हवं…

सध्याच्या काळात प्रेमाचा संदर्भ घेऊन गांभीर्याने बोलायचं तर जगप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ व सामाजिक तत्वज्ञ एरिक फ्रॉम यांच्या 1956 साली प्रसिद्ध झालेल्या ‘द आर्ट ऑफ लव्हींग’ याबद्दल बोलता येईल. या पुस्तकात फ्रॉम म्हणतात की, “प्रेम ही कला आहे जसं जगण ही एक कला तसं…. आणि कोणतीही कला आत्मसात करायची तर त्यासाठी जे करावं लागतं तीच प्रेमाची कला आत्मसात करण्यासाठी कराव लागतं ते म्हणजे त्याविषयाचं ज्ञान, कौशल्य अवगत करणं आणि त्याचा सराव करणं… प्रेमाच्या कलेमध्ये चार मुख्य घटक असतात असं ते सांगतात.. ते चार घटक म्हणजे म्हणजे काळजी, जबाबदारी, आदर, आणि ज्ञान… हे घटक प्रत्येक व्यक्ती व त्याच्या परिस्थितीनुसार याच्या व्याख्या बदलतात. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रेम म्हणजे कष्टाचे काम आहे पण त्यातून मिळणारं बक्षीस हे कश्याही पेक्षा सगळ्यातं मोठं आहे. दुसर्‍या व्यक्तीवर प्रेम करताना तुम्हाला आधी स्वतःबद्दल आणि संपूर्ण जगाबद्दल प्रेम वाटावं लागतं. स्वतःवरचं प्रेम म्हणजे उद्धटपणा किंवा इगो नाही तर स्वतःची काळजी, जबाबदारी घेणं, स्वतःला ओळखणं होय आणि जेव्हा आपण स्वतःला ओळखायला लागतो तेव्हा आपल्याला आयुष्यात नक्की काय हवं आहे हे कळत जातं. तर शेवटी काय?, एक दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करताना, आयुष्याभर प्रेमात राहण्यासाठी फ्रॉम सांगतात ती प्रेमाची कला शिकून घेऊन त्याची साधना केली तर आपण प्रेमात पडणार नाही तर कायम एकमेकांच्या प्रेमातच राहू….!

Blog By- प्रिया रुपाली सुभाष

मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.