एअरटेल आता 3G सर्व्हिस बंद करणार

| Updated on: Jun 28, 2019 | 7:13 PM

भारतीय टेलीकॉम कंपनी Bharti Airtel आता 3G सर्व्हिस बंद करत आहे. 3G सर्व्हिस बंद करत आहे, अशी घोषणा कंपनीने कोलकातामध्ये केली.

एअरटेल आता 3G सर्व्हिस बंद करणार
Follow us on

मुंबई : भारतीय टेलीकॉम कंपनी Bharti Airtel आता 3G सर्व्हिस बंद करत आहे. 3G सर्व्हिस बंद करत आहे, अशी घोषणा कंपनीने कोलकातामध्ये केली. कंपनीकडून आता 4G नेटवर्कवर लक्ष दिलं जाणार आहे. यामुळे हळूहळू आता इतर ठिकाणीही एअरटेल आपली 3G सर्व्हिस बंद करु शकते.

“आम्ही भारतात आपल्या सर्व 3G स्पेक्ट्रमला रिफ्रेम करण्यासाठी प्लानिंग करत आहे. या नेटवर्कला टप्प्या टप्प्याने 4G नेटवर्कसाठी डिप्लॉय करु. यामुळे स्मार्टफोनच्या इकोसिस्टमलाही फायदा मिळेल”, असं भारती एअरटेलचे चीफ टेक्नॉलॉडी अधिकारी म्हणाले.

एअरटेल कोलकातामध्ये 3G सर्व्हिस बंद करत आहे. पण कंपनी 2G सर्व्हिस सुरु ठेवणार आहे. कारण काही यूजर्सकडे 4G वापरण्याचा पर्याय नाही. यासाठी कंपनी अशा ग्राहकांसाठी 2G सुरु ठेवणार आहे. कंपनीने सर्व 3G ग्राहकांना आपला मोबाईल आणि सिमला अपग्रेड करण्यासाठी नोटिफिकेशन दिले आहे. कारण 4G सर्व्हिसचा फायदा अनेकांना होईल.

कोलकातामधील एअरटेलच्या काही ग्राहकांना यामुळे त्रास होऊ शकतो. कारण काही वर्षांपूर्वी 3G हँडसेटची क्रेझ होती आणि लोकांकडे 3G स्मार्टफोन आहे. अशामध्ये लोक आता 3G स्मार्टफोनचा वापर करु शकत नाही आणि त्यांना 2G चा वापर करावा लागणार. 4G स्मार्टफोनची किंमत आता सर्व सामान्यांनाही परवडणारी आहे. यामुळे युजर्सला 4G स्मार्टफोन्स अपग्रेड करण्यासाठी सोपं ठरेल.