Poco F4 GT, Smartwatch : स्मार्टवॉचसह पोकोचा ‘हा’ स्मार्टफोनही होणार लाँच… जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

| Updated on: Apr 26, 2022 | 1:50 PM

पोकोकडून आजलाँच इव्हेंट आयोजीत करण्यात आला आहे. जागतिक वेळेप्रमाणं हा कार्यक्रम दुपारी बारा वाजता आयोजीत करण्यात आला असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेपाच वाजता त्याचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

Poco F4 GT, Smartwatch : स्मार्टवॉचसह पोकोचा ‘हा’ स्मार्टफोनही होणार लाँच... जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
स्मार्टवॉच
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : पोकोच्या आजच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये पोकोच्या स्मार्टवॉचसह Poco F3 GT चे पुढील व्हर्जन असलेला पोको एफ4 जीटी (Poco F4 GT) लाँच (launch) केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जागतिक बाजारपेठेत हा स्मार्टफोन लाँच करण्यात येत असला तरी कंपनीने भारतात याचे लाँचिंग कधी होईल याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. त्यामुळे शाओमी पोकोच्या नवीन स्मार्टफोनसाठी ग्राहकांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘पोको’चे अनुज शर्मा यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना सांगितले, की Poco F4 GT सोबत कंपनी ‘पोको वॉच’ (Pocowatch) नावाच्या ब्रँडची पहिली स्मार्टवॉच देखील बाजारात आणणार आहे.

दरम्यान, एका रिपोर्टनुसार, Poco F4 GT हा संपूर्णपणे नवीन फोन नसून ते Redmi K50 फोनचे एक रीब्रँड आहे. लिक झालेल्या एका माहितीनुसार, दोघांमध्ये काही अंशी फरक आहे. Poco F4 GT वर सॉफ्टवेअर थोडे वेगळे असेल, तसेच काही इतर वैशिष्ट्ये देखील बघायला मिळू शकतील. फोनची रचना देखील Redmi K50 गेमिंग पेक्षा वेगळी असण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

काय आहे किंमत?

Poco F4 GT हा Redmi K50 गेमिंग एडिशनसारखे फिचर्स असलेला फोन असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे त्याच्या किमतीबद्दलही विविध अंदाज बांधण्यात येत आहेत. अनेकांच्या मते दोघांच्या किमतीत फार फरक नसेल. Redmi K50 गेमिंग एडिशन फोन चीनमध्ये सुरुवातीला 3,299 CNY या किमतीत लाँच करण्यात आला होता. त्याची भारतीय किंमत अंदाजे 38,600 रुपये आहे. भारतात पोको F4 GT साठी 40,000 रुपये किमतीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ही आहेत खास वैशिष्ट्य

Poco F4 GT 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसच्या प्रोटेक्शनसह उपलब्ध आहे. याला 6.67 इंच फुलएचडी+ डिसप्ले मिळू शकतो. Poco F4 GT ला क्वालकॉमचा टॉप एंड स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेट असू शकतो, 12GB पर्यंत RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध असेल. Poco F4 GT मध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि मागील बाजूस 2 मेगापिक्सेलचा मायक्रो कॅमेरा असू शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये पंच होल डिझाइनमध्ये 20 मेगापिक्सेल कॅमेरा असू शकतो. Poco F4 GT ला 120W जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी 4700mAh बॅटरी असू शकते.