डेल्टा व्हेरिएंटची भीती, फेसबुक, गुगलनंतर अमेझॉनकडून कर्मचाऱ्यांच्या Work From Home च्या मुदतीत वाढ

| Updated on: Aug 07, 2021 | 8:51 AM

जगभरात कोरोना आणि डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेझॉनने त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये पुन्हा बोलवण्याची मुदत वाढवली आहे.

डेल्टा व्हेरिएंटची भीती, फेसबुक, गुगलनंतर अमेझॉनकडून कर्मचाऱ्यांच्या Work From Home च्या मुदतीत वाढ
Amazon
Follow us on

मुंबई : जगभरात कोरोना आणि डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेझॉनने त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये पुन्हा बोलवण्याची मुदत वाढवली आहे. कंपनीने एक मेल पाठवून याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान याआधी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावले होते. मात्र कोरोनामुळे हा निर्णय बदलण्यात आला आहे. या नव्या निर्णयानुसार पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊ नये, असे आदेश दिले आहे. यानुसार आता अमेझॉनचे कर्मचारी येत्या 3 जानेवारी 2022 पर्यंत घरुनच काम (वर्क फॉर्म होम) करणार आहे. (Amazon extends Work from home option for their employees till January 2022)

अमेझॉनने आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलनुसार, कर्मचाऱ्यांच्या रिटर्न टू ऑफिस टाईमलाईन ही स्थानिक परिस्थितीनुसार जागतिक स्तरावर वेगवेगळी असेल. तसेच कंपनीने याबाबत धोरण बदलल्यास, त्याबाबतचे बदल केल्यास त्याबद्दल नोटीस पाठवली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

आपल्यातील अनेक कर्मचारी हे त्यांच्या गावी जाऊन काम करत आहे. त्यामुळे त्यांना परतण्यासाठी काही योजना आखाव्या लागतील. मात्र जेव्हा आमच्याकडे याबद्दल कोणती नवीन अपडेट आली, तर आम्ही ती तुम्हाला शेअर करु, अशी माहिती अमेझॉनने दिली आहे.

दरम्यान अमेझॉनने या मेलमध्ये ज्या कंपन्या पुढील काही काळापर्यंत वर्क फॉर्म होम करणार आहे, अशा इतर काही कंपन्यांच्या नावांचाही उल्लेख केला आहे. गेल्या महिन्यात गुगल आणि फेसबुकने याबाबतची घोषणा केली होती. गुगल आणि फेसबुकने याआधी वर्क फॉर्म होम ची सुविधा पुढील काही काळापर्यंत वाढवली आहे.

त्याशिवाय अमेझॉनने सर्व कर्मचाऱ्यांना लस घेणे अनिर्वाय केले आहेत. तसेच जे कर्मचारी लस घेणार नाहीत, त्यांना ऑफिसमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. तर फेसबुक आणि गुगलने सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण प्रमाणपत्र दाखवणे अनिर्वाय केले आहे.

इतर बातम्या

YouTube वरून कसे कमवाल महिन्याला हजारो डॉलर? काय आहेत अटी? वाचा

 भारतात केवळ 9 महिन्यांत चीनच्या ‘या’ स्मार्टफोनची 20 लाख युनिटची विक्री

अमेझॉनची डिलिव्हरी आता एका दिवसात, ‘या’ 50 शहरांमध्ये सुरु केली नवीन सेवा

(Amazon extends Work from home option for their employees till January 2022)