अॅपल कंपनी फ्रॉड, ग्राहकाची कोर्टात याचिका

| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

वॉशिंग्टन : जगातील सर्वात विश्वसनीय मोबाईल ब्रॅंड अशी ओळख असणाऱ्या अॅपल कंपनीविरोधात एका युजर्सने कोर्टात याचिका दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अॅपल कंपनीच्या स्मार्टवॉचमध्ये अनेक बिघाड होत आहे. बॅटरी चार्ज न होणे, बॅटरी फुगणे, चार्जिंगला लावलेला असताना बॅटरी अचानक गरम होणे, स्क्रीन फुगणे यांसारख्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जातात. पण याबाबत कंपनीकडून कोणतेही पाऊल उचलत […]

अॅपल कंपनी फ्रॉड, ग्राहकाची कोर्टात याचिका
अ‍ॅपल 7 जूनला लॉन्च करणार अनेक नवीन प्रोडक्ट्स
Follow us on

वॉशिंग्टन : जगातील सर्वात विश्वसनीय मोबाईल ब्रॅंड अशी ओळख असणाऱ्या अॅपल कंपनीविरोधात एका युजर्सने कोर्टात याचिका दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अॅपल कंपनीच्या स्मार्टवॉचमध्ये अनेक बिघाड होत आहे. बॅटरी चार्ज न होणे, बॅटरी फुगणे, चार्जिंगला लावलेला असताना बॅटरी अचानक गरम होणे, स्क्रीन फुगणे यांसारख्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जातात. पण याबाबत कंपनीकडून कोणतेही पाऊल उचलत नसल्याने एका ग्राहकाने अॅपलविरोधात अमेरिकेतील न्यूजर्सी कोर्टात याचिका दाखल केली आहे.

एका ग्राहकाने ऑक्टोबर 2017 मध्ये अॅपल सीरीज 3 स्मार्टवॉच खरेदी केले होते. पण जुलै  2018 मध्ये यातील एक स्मार्टवॉच चार्जिंगला लावताना अचानक या स्मार्टवॉचची स्क्रीन बाहेर आली. तसेच त्याच्या स्क्रीनवर चिरा पडल्या. यानंतर त्या ग्राहकाने हे स्मार्टवॉच नीट करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत ते पूर्ण बंद पडलं. त्यानंतर ग्राहकाने याबाबत कंपनीकडे तक्रार केली, पण कंपनीने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे संतापलेल्या ग्राहकाने न्यू जर्सीतील कोर्टात याचिका दाखल केली.

या याचिकेमध्ये ग्राहकाने अॅपल कंपनी फ्रॉड आहे. या कंपनीच्या फोनपासून स्मार्टवॉचपर्यंतच्या सर्व गोष्टी खराब आहेत. ग्राहकांनी त्या खरेदी करु नये. त्यात अनेक तांत्रिक अडचणी आहे आणि त्याला सर्वस्वी कंपनी जबाबदार आहे. विशेष म्हणजे ही कंपनी त्यांच्या स्मार्टवॉचवर डिस्काऊंट वॉरंटीही देत नाही. याआधी ही अॅपलच्या स्मार्टवॉचबाबत अनेकांनी तक्रार दाखल केली होती. त्यावेळी बॅटरी फुगणे, चार्जिंगवेळी स्मार्टवॉच गरम होणे, स्मार्टवॉच जळणे या तक्रारींचा समावेश होता. त्यावेळी अनेक ग्राहकांनी याबाबतचे पुरावेही दिले होते. फक्त स्मार्टवॉच नव्हे तर स्मार्टफोनबाबतही अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. पण त्यावेळीही कंपनीद्वारे कोणतेही पाऊल उचलले गेले नाही.

दरम्यान सध्या वादात अडकलेल्या अॅपल कंपनींद्वारे लवकरच एक स्मार्टवॉच लाँच करण्यात आलं आहे. त्या स्मार्टवॉचची ओएलईडी स्क्रीन देण्यात येणार आहे. जपानच्या डिस्प्ले इंक कंपनीद्वारे ही स्क्रीन तयार करण्यात येणार आहे. याच कंपनीद्वारे आयफोन एक्स या स्मार्टफोनची स्क्रीन तयार करण्यात आली होती.