अॅपलने आतापर्यंतचा सर्वात स्वस्त (5G iPhone) बाजारात दाखल केला आहे. कंपनीने या हँडसेटसोबत iPhone 13 आणि (iPhone 13 Pro) हे नवीन आकर्षक रंगाच्या व्हेरिंएटसह बाजारात उतरवला आहे. Apple iPhone SE 5G च्या डिझाईनमध्ये फार मोठा बदल करण्यात आलेला नाही. आता या स्मार्टफोनला 5G चे बळ देण्यात आले आहे. भारतीय मोबाईलधारकाला डोळ्यासमोर ठेऊन कंपनीने हा बदल केला आहे. वाढत्या स्पर्धेत अॅपलची क्रेझ मध्यमवर्गीय वर्गात आहे. पहिल्यांदा अॅपलने iPhone SE 5G दाखल केला आहे. फोन A15 Bionic चिपसेट सह येतो. यामध्ये 12 MP रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. 2020 मध्ये iPhone SE ही सीरीज सुरु करण्यात आली होती. त्यात थोडा बदल करुन हा फोन भारतीय बाजारपेठेत दाखल करण्यात आला आहे. नवीन प्रोसेसरसह बँटरीवर ही दमदार काम झाल्याने आता हा फोन त्यांना भूरळ घालणार यात शंका नाही.
iPhone SE 5G Price in India :
Apple iPhone SE 5G ची अमेरिकेतील किंमत 429 डॉलर आहे. 64जीबी व्हेरिएंट मोबाईलसाठी ही किंमत आकारण्यात येत आहे. भारतात या फोनची किंमत 43,900 रुपये असेल जी iPhone SE 2020 पेक्षा जास्त आहे. iPhone SE 2020 चे बेसिक मॉडेलची किंमत 42,500 रुपेय इतकी होती.
इतर बातम्या
Two-wheeler sales fell : दुचाकीचे चाक ‘रुतले’! विक्री प्रचंड घटली, काय कारणं? वाचा सविस्तर
Airtel-Axis Bank चे क्रेडिट कार्ड, फायद्याचे भंडार
Share Market | 4 दिवसांत 6% पेक्षा जास्त पडझड! गुंतवणूकदारांचे तब्ब 11.28 लाख कोटी बुडाले