आयफोन विकत घेण्यासाठी कर्ज देणार Apple, इतक्या हप्त्यात चुकवा रक्कम, चेक करा

आयफोन घेण्याची इच्छा आहे परंतू पैसे नाहीत अशी स्थिती असेल तर आता अशा ग्राहकांसाठी आयफोन कंपनी एप्पल हीने हप्त्यावर फोन विकत देण्याची चांगली योजना बाजारात आणली आहे.

आयफोन विकत घेण्यासाठी कर्ज देणार Apple, इतक्या हप्त्यात चुकवा रक्कम, चेक करा
iphone-14-modeL
Image Credit source: socialmedia
| Updated on: Mar 30, 2023 | 2:28 PM

मुंबई – आयफोन प्रचंड महागडे असतात. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही आयफोन विकत घेता येत नाही, अशा लोकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आली आहे. आता आयफोन बनविणाऱ्या एप्पल कंपनीने ग्राहकांसाठी ‘बाय नाऊ पे लेटर’ योजना आणली आहे. ही एक क्रेडीट सर्व्हीस असून त्यात युजर आधी आयफोन मोबाईल विकत घेऊ शकणार आहेत, त्यानंतर त्याचे पैसे त्यांना हप्त्यामध्ये नंतर भरावे लागणार आहेत.

आयफोन स्वत: जवळ असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. परंतू त्यांच्या महागड्या किंमतीमुळे प्रत्येकाला आयफोन घेणे परवडत नाही. त्यासाठी एप्पल कंपनीने ‘बाय नाऊ पे लेटर’ सर्व्हीस आणली आहे. यात युजरना आधी आयफोन दिला जाईल. त्यानंतर ठराविक मुदतीत हप्त्यांनी पैसे भरावे लागतील, या सेवेत युजरकडून व्याज किंवा कोणत्याही प्रकारचे दुसरे चार्ज आकारण्यात येणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. एप्पलने युजरला या स्कीमनूसार चार हप्त्यात पैसे चुकविण्याची सवलत देण्यात येणार आहे. म्हणजे जर तुम्ही एक लाखाचा आयफोन खरेदी करणार असाल तर 25 हजाराचे चार हप्ते तुम्हाला भरावे लागतील. यासाठी एप्पल कंपनीने एक टाईमफ्रेम सेट केली आहे, तुम्हाला पहिला हप्ता फोन विकत घेतल्यानंतर सहा आठवड्यांनी म्हणजेच 45 दिवसांनी भरावा लागणार आहे.

लोनच्या अटी काय आहेत…

या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला अनेक निकष आणि कसोट्यांवर सिद्ध व्हावे लागणार आहे. या सेवेचा तेच लाभ उठवू शकणार आहेत ज्यांचा क्रेडीट स्कोर चांगला आहे. म्हणजे तुम्ही लोन घेत आहात तर ते चुकविण्याची तुमची क्षमता काय आहे हे पाहूनच एप्पल तुम्हाला आयफोन देणार आहे. यानंतर युजर आयफोन किंवा आयपॅडला ऑनलाईन खरेदी करताना ‘बाय नाऊ पे लेटर’ या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. या योजने अंतर्गत युजर्सना 4,113 रूपयांपासून 82,271 रूपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. या सेवेचा लाभ अवॅल एप्पल पे द्वारे घेता येऊ शकतो. याशिवाय ऑनलाईन आणि इन एपने आयफोन आणि आयपॅड खरेदी केल्यानंतर बाय नाऊ पे सेवेचा लाभ घेता येणार आहे.