
चॅटजीपीटी सध्या जोरदार चर्चेत आहे. चॅटजीपीटीमुळे तुमचे काम आता सोप्पे होणार आहे. विशेष म्हणजे ओपनएआयने नुकताच केलेल्या घोषणेप्रमाणे चॅटजीपीटी गो सबस्क्रिप्शन आता सर्व वापरकर्त्यांसाठी तब्बल 1 वर्षांसाठी मोफत करण्यात आलंय. एक वर्ष तुम्ही मोफतमध्ये चॅटजीपीटी वापरू शकणार आहात. कोणत्याही प्रकारचे पैसे न भरता तुम्ही याचा वापर करू शकता. साधारणपणे दरमहिन्याला 399 रुपये आहे जी 12 महिन्यांसाठी 4788 रुपये होते आणि ऑफरसह, ती आजपासून मोफत उपलब्ध आहे. जर तुम्हाला ChatGPT Go सबस्क्रिप्शन मोफत कसे मिळवायचे याबद्दल माहिती नसेल तर अगदी सोप्पा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता. तो कसा ते खाली जाणून घ्या.
तुम्हाला नक्की काय करावे लागेल? जाणून घ्या
स्मार्टफोन किंवा लॅपटॉपमध्ये वेब ब्राउझर किंवा चॅटजीपीटी अॅप डाऊनलोड करा. लॉगिन करून घ्या. तिथे विचारलेली माहिती भरा.
चॅटजीपीटी सबस्क्रिप्शन मोफत मिळवण्यासाठी हे करा फॉलो
चॅटजीपीटी अॅप ओपन करा. आता तुमच्या क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा. तुमच्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा किंवा क्लिक करा. नंतर तुमचा प्लॅन अपग्रेड करा निवडा. तुम्ही सेटिंग्ज -> सबस्क्रिप्शन – चॅटजीपीटी गो सबस्क्रिप्शन निवडा. प्लॅन सक्रिय करण्यासाठी ऑन-स्क्रीन सूचनांचे फॉलो करा. हे सर्व केल्यानंतर चॅटजीपीटी गो प्लॅन आता तुमच्या खात्याशी जोडला जाईल.
ChatGPT Go कडून मिळणाऱ्या सुविधा
OpenAI च्या प्रमुख मॉडेलसह अधिक सूचना आणि प्रतिसादांचा आनंद घ्या. अधिक फोटो तयार करा आणि विस्तृत श्रेणीच्या फायलिंग करा. डेटा एक्सप्लोरेशन आणि प्रॉब्लेम सोडवण्यासाठी पायथॉनचा वापर करा.
ChatGPT Go मध्य API वापर समाविष्ट नाही
OpenAI च्या API किंमती अंतर्गत स्वतंत्रपणे बिल केले जाते. – कोणतेही लेगसी मॉडेल नाहीत. GPT-4o आणि GPT-4 टर्बो सारखे जुने मॉडेल यामध्ये उपलब्ध नाहीत. सोराच्या माध्यमातून व्हिडिओ जनरेशन प्लस आणि प्रो वापरकर्त्यांसाठी मर्यादित आहे. यामुळे आता ChatGPT Go मुळे तुमची कामे अत्यंत सहज आणि सोपी होणार आहेत.